मृण्मयी देशपांडेच्या लग्नाला ७ वर्ष पूर्ण, नवऱ्यासोबतचा लिपलॉक फोटो केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 11:29 AM2023-12-03T11:29:41+5:302023-12-03T11:30:57+5:30
मृण्मयीच्या या फोटोमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) नुकतीच हिंदी वेबसिरीजमध्ये झळकली. 'मुंबई डायरीज' या गाजलेल्या वेबसिरीजच्या दुसऱ्या भागात तिने महत्वाची भूमिका साकारली. मृण्मयी सध्या सारेगमप लिटिल चॅम्प्सचं सूत्रसंचालनही करत होती. तर आज मृण्मयीच्या लग्नाला ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. या खास दिवशी तिने नवऱ्यासोबतचा लिपलॉक फोटो शेअर केला आहे. मृण्मयीच्या या फोटोमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मृण्मयी देशपांडे ३ डिसेंबर २०१६ रोजी उद्योगपती स्वप्नील रावसोबत लग्नबंधनात अडकली. त्यांच्या लग्नाची तेव्हा जोरदार चर्चा झाली होती. पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. आज त्यांच्या लग्नाला ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. मुंबईतलं धकाधकीचं जगणं सोडून ती नवऱ्यासोबत महाबळेश्वरला शिफ्ट झाली आहे. तिथे ते दोघं शेतीही करतात. मृण्मयीने एक रोमँटिक फोटो शेअर करत नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी तिने चक्क लिपलॉकचा फोटो निवडला आहे. '7! आय लव्ह यू राव' असं तिने कॅप्शन दिलं आहे.
मृण्मयीच्या या फोटोवर अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत, अभिजीत खांडकेकर, सायली संजीव, सुव्रत जोशीसह अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तसंच चाहत्यांनीही मृण्मयीवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.