नवी मालिका, नवी भूमिका! पल्लवी पाटील छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला, प्रोमो समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 05:12 PM2024-03-20T17:12:52+5:302024-03-20T17:14:37+5:30

गेले काही दिवस पल्लवी छोट्या पडद्यापासून दूर होती. पण आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. लवकरच पल्लवीची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

marathi actress pallavi patil new marathi serial aadishakti to play lead role promo video | नवी मालिका, नवी भूमिका! पल्लवी पाटील छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला, प्रोमो समोर

नवी मालिका, नवी भूमिका! पल्लवी पाटील छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला, प्रोमो समोर

पल्लवी पाटील ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मराठी मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये काम करून तिने कलाविश्वात तिचं वेगळं स्थान निर्माण केलं. पण गेले काही दिवस पल्लवी छोट्या पडद्यापासून दूर होती. पण आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. लवकरच पल्लवीची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'आदिशक्ती' असं पल्लवीच्या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेच पल्लवी मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच या मालिकेच प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये देवळात जात असलेल्या पल्लवीला कुणीतरी मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तेवढ्यात एक गाडी येऊन त्या व्यक्तीला उडवल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. दिव्यशक्ती आणि भक्तीवर आधारित असलेली 'आदिशक्ती' ही मालिका सन मराठीवर प्रसारित होणार आहे. पल्लवीला पुन्हा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. 

अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या पल्लवी पाटीलला रुंजी या मालिकेतून लोकप्रियता मिळाली.आजही पल्लवी पाटील 'रुंजी' मालिकेमुळेच चाहत्यांच्या लक्षात आहे. तिने 'बापमाणूस', 'अग्निहोत्र 2', 'वैदही' अशा मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती जर तरची गोष्ट या नाटकात काम करत आहे. या नाटकात पल्लवीबरोबर आशुतोष गोखले, उमेश कामत, प्रिया बापट हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: marathi actress pallavi patil new marathi serial aadishakti to play lead role promo video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.