माझ्या राजा रं...! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अमेरिकेत बनवला बर्फाचा किल्ला, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 15:18 IST2024-02-19T15:18:11+5:302024-02-19T15:18:32+5:30
Shivjayanti 2024 : मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत अनोख्या पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा केला आहे.

माझ्या राजा रं...! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अमेरिकेत बनवला बर्फाचा किल्ला, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...
आज संपू्र्ण महाराष्ट्रात शिवजयंतीचा उत्साह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३९४वी जयंती आहे. आपल्या लाडक्या राजाची शिवजयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी होत आहे. महाराजांची किर्ती सर्वदूर पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत अनोख्या पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा केला आहे.
'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्रांजल आंबवणे. या मालिकेत तिने नेत्रा हे पात्र साकारलं होतं. प्रांजल सध्या अमेरिकेत आहे. अमेरिकतच तिने खास पद्धतीने शिवजयंती साजरी केली. शिवजयंती निमित्ताने प्रांजलने अमेरिकेत बर्फापासून किल्ला बनवला. याचे काही फोटो आणि व्हिडिओ तिने शेअर केले आहेत. "सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा…दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
प्रांजलला 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती फोटो शेअर करताना दिसते. सध्या ती अमेरिकेत असते.