थेट लंडनमध्ये होणार 'माझी तुझी रेशीमगाठ'चं चित्रीकरण?; प्रार्थनाचं शुटिंग राहणार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 02:22 PM2022-05-12T14:22:26+5:302022-05-12T14:29:01+5:30

Prarthana behere: सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये प्रार्थना लंडनमध्ये राहूनही मालिकेचं चित्रीकरण करणार आहे. त्यामुळे तिने कुठेही ब्रेक न घेतल्याचं सांगण्यात येत आहे. 

marathi actress prarthana behere completing the shoot of mazi tuzi reshimgath serial in london | थेट लंडनमध्ये होणार 'माझी तुझी रेशीमगाठ'चं चित्रीकरण?; प्रार्थनाचं शुटिंग राहणार सुरु

थेट लंडनमध्ये होणार 'माझी तुझी रेशीमगाठ'चं चित्रीकरण?; प्रार्थनाचं शुटिंग राहणार सुरु

googlenewsNext

'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत यशस्वी घोडदौड करत आहे. ही मालिका सुरु झाल्यापासून त्यातील यश आणि नेहा म्हणजेच अभिनेता श्रेयस तळपदे (shreyas talpade) आणि प्रार्थना बेहरे (prarthana behere ) यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षक केवळ या दोघांसाठी आणि चिमुकल्या परीसाठी ही मालिका आवर्जुन पाहतात. यामध्येच सध्या प्रार्थनाने या मालिकेतून ब्रेक घेतल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, प्रार्थनाने कोणत्याही प्रकारचा ब्रेक घेतलेला नसून ती आता थेट लंडनवरुन चित्रीकरण करणार आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रार्थना आणि तिचा पती अभिषेक लंडनला गेले आहेत. येथील एक व्हिडीओ शेअर करत तिने लंडन ठुमकदा असं कॅप्शनही दिलं होतं. त्यामुळे सध्या ती लंडनला असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे प्रार्थनाने मालिकेतून ब्रेक घेत ती फिरायला गेल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, प्रार्थना लंडनला असूनही तेथून मालिकेचं चित्रीकरण पूर्ण करणार आहे.

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये प्रार्थना लंडनमध्ये राहूनही मालिकेचं चित्रीकरण करणार आहे. त्यामुळे तिने कुठेही ब्रेक न घेतल्याचं सांगण्यात येत आहे. या मालिकेत सध्या नेहा, परीला चौधरींच्या घरी एकटं सोडून ऑफिसच्या कामासाठी विदेशात गेल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे आता प्रार्थना लंडनवरुनच हे शूट पूर्ण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
 

Web Title: marathi actress prarthana behere completing the shoot of mazi tuzi reshimgath serial in london

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.