'सिंधुताई माझी माई'मधून ही प्रसिद्ध अभिनेत्री गाजवणार छोटा पडदा, साकारणार महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 05:56 PM2023-08-03T17:56:39+5:302023-08-03T18:02:33+5:30

अनेक वर्षांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अभिनय करण्यासाठी ही अभिनेत्री सज्ज झाली आहे.

Marathi actress priya berde will be seen in sindhutai mazi mai serial marathi | 'सिंधुताई माझी माई'मधून ही प्रसिद्ध अभिनेत्री गाजवणार छोटा पडदा, साकारणार महत्त्वाची भूमिका

'सिंधुताई माझी माई'मधून ही प्रसिद्ध अभिनेत्री गाजवणार छोटा पडदा, साकारणार महत्त्वाची भूमिका

googlenewsNext

ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अनाथ मुलांसाठी वेचलं अशी मूर्तिमंत अनाथांची आई म्हणजेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित "सिंधुताई सपकाळ". त्यांचा महाराष्ट्राच्या अनाथ लेकरांची माई बनण्यापर्यंतचा प्रवास हा अंगावर शहारे आणणारा, काळीज पिळवटून टाकणारा होता. कुठून आणि कसा सुरु झाला हा प्रेरणादायी प्रवास ? चिंधी अभिमान साठे पासून सिंधुताई सपकाळ कशी घडली ? हा प्रवास आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. कलर्स मराठीवर "सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची" १५ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 
या मालिकेत सिंधुताईंची भूमिका कोण साकारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला आहे आणि अभिनेते किरण माने या मालिकेत सिंधुताईंच्या वडिलांची भूमिका करत आहेत. चिंधीच्या आईची भूमिका योगिनी चौक साकारणार आहे. तर आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यात चिंधीच्या आजीच्या भूमिकेत दिसणार आहे प्रिया बेर्डे अनेक वर्षांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अभिनय करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्या मालिकेत चिंधीच्या आजीची भूमिका साकारणार आहेत.  

अनाथ मुलांच्या संगोपनासाठी त्यांनी १९९२ साली सावित्रीबाई वसतिगृहाची स्थापना चिखलदरा येथे केली. आणि तिथून सुरू झालेला प्रवास कधीच थांबला नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यांच्या कामगिरीने प्रभाव पाडला. वात्सल्याचा मानबिंदू, ममतेचा झरा म्हणेज सिंधुताई. लाखो अनाथ बालकांना सिंधुताईंनी करुणेचं आभाळ दिलं... त्यांचं संगोपनचं नव्हे तर प्रत्येकाची वैचारीक जडणघडण केली. त्यांचा हा संघर्षमय प्रवास आता आपल्याला बघता येणार आहे. 

Web Title: Marathi actress priya berde will be seen in sindhutai mazi mai serial marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.