लग्नानंतर १० वर्षांनी गरोदर राहण्याबाबत मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “IVF आणि सरोगसी...”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 07:18 PM2023-08-23T19:18:24+5:302023-08-23T19:19:22+5:30
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री लग्नाच्या दहा वर्षांनी आई होणार आहे. याबाबत तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
गेल्या काही दिवसांत मनोरंजनविश्वातील अनेक अभिनेत्रींनी एका मागोमाग एक आई होणार असल्याची गुडन्यूज दिली. ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री राधा सागरनेदेखील काही दिवसांपूर्वी गरोदर असल्याचं सांगितलं होतं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राधाने ही गोड बातमी चाहत्यांना दिली होती. नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याने राधाचे कुटुंबीयही आनंदी आहेत. लग्नानंतर १० वर्षांनी राधा आई होणार आहे. सध्या ती गरोदरपणातील काळ एन्जॉय करताना दिसत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राधाने याबाबत भाष्य केलं आहे.
राधा सागरने नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने गरोदरपणातील काळ, करिअर याबाबत भाष्य केलं. याबरोबरच राधाने लग्नानंतर १० वर्षांनी गरोदर राहण्याच्या निर्णयाबाबतही खुलासा केला. ती म्हणाली, “आमच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नानंतर मी माझ्या करिअरला सुरुवात केली. लग्नानंतर लगेचच मुलं होऊ न देण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. आम्हा दोघांनाही करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं होतं. करिअरमध्ये पुढे गेल्यानंतरच आम्ही विचारपूर्वक आईबाब होण्याचा निर्णय घेतला आहे. गरोदरपणात पती आणि कुटुंबीयांकडून सहकार्य मिळणं ही सर्वात मोठी गोष्ट असते.”
‘चांद्रयान ३’च्या यशस्वी लँडिंगनंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला "चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर..."
“करिअरमधून ब्रेक घेत आई होण्याचा निर्णय मी घेतला. आताच्या काळात अनेक जण सरोगसी आणि आयव्हीएफच्या मदतीने आईबाबा होण्याचा निर्णय घेतात. पण मला सामान्यरित्या गरोदर राहायचं होतं आणि ते शक्यही झालं,” असंही राधा सागरने सांगितलं. प्रसुतीनंतर करिअरमधून काही काळ ब्रेक घेणार असल्याचंही राधाने सांगितलं आहे. करिअरमधून ब्रेक घेऊन बाळासाठी वेळ देणार असल्याचं राधा म्हणाली.
राधिकाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे राधिका प्रसिद्धीझोतात ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मध्ये ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.