Radhika Deshpande : "चार हात, दोन फोन, 'एक'नाथ; शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण…"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 10:36 AM2023-05-17T10:36:35+5:302023-05-17T10:51:12+5:30

Radhika Deshpande And CM Eknath Shinde : अभिनेत्री राधिका देशपांडे हिला आता बालनाट्य शिबिरासाठी शासनाचा हॉल मिळाला आहे. तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

marathi actress Radhika Deshpande insta Post Over thanks to CM Eknath Shinde | Radhika Deshpande : "चार हात, दोन फोन, 'एक'नाथ; शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण…"

Radhika Deshpande : "चार हात, दोन फोन, 'एक'नाथ; शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण…"

googlenewsNext

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत अरुंधतीची सर्वात जवळची आणि लाडकी मैत्रीण देविका अनेकांच्या लक्षात आहे. अभिनेत्री राधिका देशपांडे (Radhika Deshpande) ही भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वी राधिकाची एक पोस्ट तुफान व्हायरल झाली. भलीमोठी पोस्ट लिहून तिने आपला संताप व्यक्त केला होता. बालनाट्य शिबिरासाठी शासनाचा हॉल सवलतीच्या दरात मिळावा, यासाठी राधिका प्रयत्न करत होती. मात्र कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे तिला अडचणींचा सामना करावा लागला. चार कागद, दोन सह्या, एक शिक्का... अशा आशयाच्या पोस्टमध्ये तिने आपला संताप व्यक्त केला होता. पण आता तिची आणखी एक पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. 

अभिनेत्री राधिका देशपांडे हिला आता बालनाट्य शिबिरासाठी शासनाचा हॉल मिळाला आहे. तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. "चार हात, दोन फोन, एक नाथ. एकनाथ जी शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. पण तुम्हाला आशेनं टॅग करत पोस्ट टाकली. मला वाटलं माझी हाक पोहोचणार नाही कदाचित पण आर्ततेने मारलेली हाक तुमच्यापर्यंत पोहोचली. आता मुलं ही म्हणायला लागली आहेत. "एक नाथ कसा असावा तर असा!" धन्यवाद" असं म्हटलं आहे. राधिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत पोस्ट केली आहे. 

""चार कागद, दोन सह्या, एक शिक्का" ते "चार हात, दोन फोन, एक नाथ."
"सियावर रामचंद्र की जय"
मी १८ एप्रिल ला माझी बाजू मांडत एक पोस्ट केली होती. त्या व्हायरल झालेल्या सोशल मीडिया पोस्टचा हा उत्तरार्ध.
मी मागच्या पोस्टमध्ये म्हणाले होते, "मी माघार घेतला, हार मानली नाही. माझी मुलं आणि मी नाटक करणार, हॉल मिळणार, दणदणीत प्रयोग आम्ही करणार पण माझ्या सकट बाल कलाकारांसाठी ज्यांनी हॉल उपलब्ध करून दिला नाही, त्रास नाही तर छळ केला त्यांना हे उद्याचे नागरिक धडा शिकावल्याशिवाय राहणार नाहीत." तसेच घडले.
ताजे टवटवीत फोटो आहेत, आठवणींच्या पेटीत मऊ मखमली शालीत ठेवण्यासारखे. त्यात आहेत नेते, अभिनेते, मंत्री, महामंत्री , प्रचारक, स्वयंसेवक, महागुरू आणि डॉक्टर. फोटो वर्तमानातला आहे. पण ह्यात मला भविष्यातली बलशाली पिढी घडताना दिसते आहे.
"देश बदल रहा है, तरक्की सुनिश्चित है", असं मला दिसतं आहे.
पार्श्वभूमी अशी की मी बालनाट्य शिबिरासाठी हॉल शोधत होते. सरकार वर नव्हे तर सरकारी कामगार वर्गाच्या काम करण्याच्या पद्धतीवर नाराज होते. कामात कामचोरी, हलगर्जीपणा, बेशिस्त वागणं आणि उद्धट बोलणं खपवून घेणं मला जमलं नाही, जमत नाही. माझ्यावर अन्याय होतो आहे, माझ्या कामात अडथळा आणला जातो आहे हे लक्षात येता मी आवाज उठवला. आणि सरकार कडून त्वरित कारवाई सुरू झाली. चार हात कामाला लागले, मला दोन फोन आले आणि सांगण्यात आलं की कसली ही काळजी करू नका, तुमचं काम होईल. वरिष्ठांनी दखल घेतली आहे. एकनाथ जी शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. पण तुम्हाला आशेनं टॅग करत पोस्ट टाकली. मला वाटलं माझी हाक पोहोचणार नाही कदाचित पण आर्ततेने मारलेली हाक तुमच्या पर्यंत पोहोचली. यंत्रणा हलली. आम्हाला हॉल मिळाला, आम्ही नाटक सादर केलं. एक प्रभु श्रीराम आमच्या पाठीशी आहेत पण तुम्ही त्याचे दूत बनून आमचा मार्ग मोकळा करून दिलात. लहान मुलांसमोर एक उदाहरण ठरलात. आता मुलं ही म्हणायला लागली आहेत. "एक नाथ कसा असावा तर असा!" धन्यवाद.
अतिथी म्हणून आलेल्यांसाठी आमच्या चेहऱ्यावरच्या आनंदाची आरास आहे आणि आम्ही झालर बनून उभे आहोत आशेने पहात. धन्यवाद.
२ माणसं वाईट भेटली पण ४ चांगली माणसं ही भेटली आम्हाला! विशेष उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे मंजुश्री ताई खर्डेकर, संदीप खर्डेकर, सचिन पाषाणकर, किरण साळी, राहुल सर. धन्यवाद.
"चार कागद, दोन सह्या, एक शिक्का" ची कहाणी "चार हात, दोन फोन, एक नाथ" पर्यंत सुफळ संपन्न.
बोलो "सियावर रामचंद्र की जय"" असं राधिका देशपांडे हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 
 

Web Title: marathi actress Radhika Deshpande insta Post Over thanks to CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.