"आपल्याला काय फरक पडतो? म्हणणाऱ्यांनो...", ‘स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाबाबत प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 04:23 PM2024-03-25T16:23:48+5:302024-03-25T16:24:45+5:30

"काळ्या पाण्यात निळाशार हीरा गवसला", रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमासाठी अभिनेत्रीची पोस्ट

marathi actress radhika deshpande shared special post for randeep hooda swatantryaveer savarkar movie | "आपल्याला काय फरक पडतो? म्हणणाऱ्यांनो...", ‘स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाबाबत प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

"आपल्याला काय फरक पडतो? म्हणणाऱ्यांनो...", ‘स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाबाबत प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमातून वीर सावरकरांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेक सेलिब्रिटीही या सिनेमाबाबत पोस्ट शेअर करत आहेत. नुकतंच प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचं अनेक सेलिब्रिटींकडून कौतुक होत आहे. मराठी अभिनेत्री राधिका देशपांडेनेदेखील या सिनेमाबाबत खास पोस्ट शेअर केली आहे. राधिकाने थिएटरमधील फोटो शेअर केला आहे. "५ स्टार्स पैकी १० स्टार्स. काळ्या पाण्यात निळाशार हीरा गवसला ~ हरपला. असं म्हणतात नीलम खडा ज्याला लाभी ठरला त्याचं नशीब उजळलं आणि ज्याला लाभी ठरला नाही त्याची अधोगती पक्की. ब्रिटिशांनी सावरकरांना म्हणूनच लांब ठेवलं. त्यांनी त्यांना वेळेत ओळखलं पण आपल्याला मात्र हा हीरा अजूनही खऱ्या अर्थानं नाही गवसला. मातृभूमीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने, अखंड भारताचे स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकाने, हिंदू असण्याचा जाज्वल्य अभिमान असणाऱ्या प्रत्येकाने हा सिनेमा बघायला हवा आणि तुम्ही वरील कोणीही नसलात तरी तुम्हाला बघायलाच पाहिजे. “जाऊ द्या नं, आपल्याला काय फरक पडतो?” म्हणणाऱ्यांसाठी मी देते ‘स्वातंत्र्यवीर सावरकर‘ ह्या सिनेमाला ५ पैकी १० स्टार्स. सिनेमा कसा होता हे विचारण्या पेक्षा ‘तुम्ही‘ का पाहिला ह्याचे उत्तर मला जाणून घ्यायला आवडेल," असं म्हणत राधिकाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमाचं दिग्दर्शन रणदीप हुड्डाने केलं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्याने दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आहे. या सिनेमातील रणदीप हुड्डाच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. रणदीप हुड्डाबरोबर या सिनेमात अभिनेत्री अंकिता लोखंडेही झळकली आहे. अंकिताने या सिनेमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली आहे. 

Web Title: marathi actress radhika deshpande shared special post for randeep hooda swatantryaveer savarkar movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.