फुलांची रांगोळी, दिव्यांची रोषणाई अन्...; थाटामाटात झाला रेश्मा शिंदेचा गृहप्रवेश! व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 08:45 AM2024-12-03T08:45:28+5:302024-12-03T08:46:30+5:30
रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेने पतीसोबत गृहप्रवेश केलाय. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय
'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे ही सर्वांची लाडकी अभिनेत्री. रेश्माला आपण विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. रेश्माने काहीच दिवसांपूर्वी लग्नगााठ बांधली. पवनसोबत रेश्माने लग्न केलं. रेश्माच्या लग्नाला सिनेइंडस्ट्रीतील तारे तारका सहभागी झाले होते. अशातच लग्नानंतर रेश्माच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये साध्या पद्धतीने तरीही आकर्षक सजावट करुन पवनच्या कुटुंबाने रेश्माचा गृहप्रवेश केला.
असा झाला रेश्माचा गृहप्रवेश
रेश्मा शिंदेने तिच्या सोशल मीडियावर गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये सुरुवातीला दिसतं की, पवनच्या घराला रोषणाई केलेली दिसून येते. पुढे घरात आणि घराबाहेर फुलांची रांगोळी काढलेली दिसते. रेश्मा पवनचा हात धरुन माप ओलांडते. पवनचे कुटुंबिय रेश्माचं औषण करतात. नंतर रेश्मा घरात प्रवेश करते. घरामध्ये आल्यावर रेश्माने तिचं सुंदर फोटोशूट केलेलं दिसतं. अशाप्रकारे पवनच्या साथीने रेश्माने गृहप्रवेश केलाय.
रेश्मा शिंदेने थाटामाटात केलं लग्न
रेश्मा शिंदेने २९ नोव्हेंबरला पवनसोबत थाटामाटात लग्न केलं. रेश्माचा नवरा पवन काय काम करतो याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाहीये. दरम्यान रेश्माने पारंपरिक पद्धतीने साऊथ इंडियन अंदाजात लग्न केलंय. रेश्माच्या लग्नाला तिचे कुटुंबीय अन् मनोरंजन विश्वातील तिचे कलाकार मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. सध्या रेश्मा स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत अभिनय करतेय.