'फुटेज मिळेपर्यंत हिंसा हवीच असते...'; Ex स्पर्धक रुचिरा जाधवची बिग बॉस मराठीविषयी परखड पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 04:08 PM2024-08-15T16:08:56+5:302024-08-15T16:09:17+5:30

बिग बॉस मराठीमध्ये जी हिंसा आणि मारामारी पाहायला मिळते त्याविषयी रुचिरा जाधवने तिचं परखड मत व्यक्त केलंय (bigg boss marathi 5)

marathi actress ruchira jadhav talk about bigg boss marathi 5 violence | 'फुटेज मिळेपर्यंत हिंसा हवीच असते...'; Ex स्पर्धक रुचिरा जाधवची बिग बॉस मराठीविषयी परखड पोस्ट

'फुटेज मिळेपर्यंत हिंसा हवीच असते...'; Ex स्पर्धक रुचिरा जाधवची बिग बॉस मराठीविषयी परखड पोस्ट

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनबद्दल बिग बॉस मराठीमध्ये जाऊन आलेले माजी स्पर्धक सातत्याने टिकाटिप्पणी करत आहेत. अशातच बिग बॉस मराठी  ४ मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री रुचिरा जाधवने परखड शब्दात बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनबद्दल पोस्ट केलीय. रुचिरा लिहिते, "मला आशा आहे अभिजीत फिट अँड फाईन असेल. प्रामाणिकपणे सांगायचं तर एकेकाळी माझा favourite असणारा show आता मी बघत नाही. (कारण त्या so called 'घरात' मी जाऊन आलेय.)

रुचिरा पुढे लिहिते, "Social media वरून updates मिळत असतात. नुकतच एका reel मध्ये Abhijeet ला weekend ला छान व्यक्त झालेला बघितलं आणि त्याची ती गोष्ट भावली मला. So just felt like sharing..  मुळात 'हिंसेला' तिथे जागा नाही, अस म्हटलं जातं. पण फक्त म्हटलं जातं. Footage मिळेपर्यंत हिंसा हवीच असते Or else let's say चालते. एकदा का footage मिळालं, की मग आवाज येतो. “थांबा”! Hahahahah! (I may be wrong.. पण मी फक्त मला आलेल्या अनुभवावरून बोलतेय.) 


रुचिरा पुढे लिहिते, "फार जवळून बघितलंय मी हे सगळं. पहिल्यांदा संचालक झाले, तेव्हा समोर दिसणारी हिंसा थांबवण्यासाठी rather अजून वाढू नये म्हणून task hold केला होता मी. Weekend ला ओरडा पडला मला. दुसऱ्यांदा संचालक झाले, तेव्हा ठरवलं... काहीही.. अगदी काहीही झालं तरी चालेल, मी मधे पडणार नाही; थांबवणार नाही.
फार काही नाही.. तेव्हा काचा फुटल्या होत्या, त्या दोन सदस्यांना खुप लागलं होतं, काचा पाठीत रुतल्या होत्या. "त्यानंतर” task थांबवण्यात आला. हा आहे "मानवी भावनांचा खेळ" Unfortunately, काही अपवाद सोडले तर आजच्या audience ला हेच बघायचंय. बघा. (जेवढं दाखवतात तेवढं बघा. त्याच्या beyond सुद्धा बरच काही घडत असतं जे फक्त तिथे गेल्यावर कळतं..) 


रुचिरा शेवटी लिहिते, "मला या शोबद्दल कोणताही द्वेष नाही. मी  माझ्या प्रत्येक कामाचा आदर करत आले आहे. या शोची मी कायम ऋणी असेन कारण जगाची अंधारलेली बाजू या शोने मला दाखवली. मी जुनी रुचिरा राहिले नाही. याचं  संपूर्ण क्रेडिट बिग बॉसला जातं. Big Boss - the show & the REAL BOSS out there मानवी भावना प्रत्येकवेळी आणि कायम जिंकत आली आहे."

Web Title: marathi actress ruchira jadhav talk about bigg boss marathi 5 violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.