"ज्यांनी मला ट्रोल केलं त्यांना.."; संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाल्यावर ऋतुजा बागवेची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 04:01 PM2024-11-22T16:01:13+5:302024-11-22T17:01:11+5:30
अनन्या नाटकातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या मराठी अभिनेत्रीची खास पोस्ट चर्चेत आहे (rutuja bagwe)
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. ऋतूजाने गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीत कार्यरत आहे. इतकंच नव्हे तर 'अनन्या' या नाटकातून ऋतुजाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ऋतुजाने अलीकडेच हिंदी मालिकेतही स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली. ऋतुजाच्या कारकीर्दीत तिला मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्यावर ऋतुजाने तिच्या भावना व्यक्त केल्यात.
ऋतुजाने व्यक्त केल्या भावना
ऋतुजाने पुरस्काराच्या मानचिन्हासोबतचा फोटो शेअर करत लिहिलंय की, "उस्ताद बिस्मिल्लाह ख़ॉं युवा पुरस्कार २०२३ (रंगमंच अभिनय). संगीत नाटक अकादमी. मी नाटकवेडी तुला कोणत्या माध्यमात काम करायला जास्त आवडतं विचारल्यावर मी क्षणाचाही विलंब न घेता उत्तर देते.. “नाटक” इतका मोठा मानाचा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा जरा मनात धस्स झालं ,मनात आलं आपण फार काम केलं नाहिये आपण हा पुरस्कार deserve करतो का? (२२)एकांकिका (२) प्रायोगिक नाटक (३) व्यावसायिक नाटक."
ऋतुजा पुढे लिहिते, "मी जे काम केलं जीव ओतुन केलं एव्हढं मात्र नक्की. आणि त्याची जेव्हा राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाते. तो आनंद आत्मा सुखावणारा असतो… आणि हयात मोलाचा वाटा आहे “ अनन्या “ नाटकाचा.. अनन्या नाटकाचे मी ३०० प्रयोग केले, हया नाटकाने कौतुक,पुरस्कार,समाधान,प्रसिद्धि,पैसा,मायबाप रसिक प्रेक्षकांच प्रेम खुप काही दिलं… आज हा पुरस्कार मी “अनन्या” ला आणि माझ्या अनन्याच्या संपूर्ण team ला dedicate करते…. All the haters,trollers,who disrespected me and discourage me Thank you.. and my family,friends,well wishers, who supported me and believed in me ,मायबाप रसिक प्रेक्षक ज्यांनी भरभरुन प्रेम दिलं. कायम ऋणी राहीन. lots of love and Respect."