लग्नाच्या दोन वर्षांनी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 11:47 IST2023-08-17T11:40:10+5:302023-08-17T11:47:21+5:30
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनी दिली गुडन्यूज

लग्नाच्या दोन वर्षांनी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज
‘बिग बॉस मराठी’तून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. तिने अनेक चित्रपटांतही काम केलं आहे. सध्या सई मनोरंजन विश्वापासून लांब आहे. असं असलं तरी ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहते. सईने सोशल मीडियावरुन तिच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. सई लवकरच आई होणार आहे.
सईने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ आणि काही फोटा शेअर करत आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. या पोस्टला तिने “आम्हाला हे सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की आमच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. याने आमच्या आयुष्यात खूप आनंद, प्रेम आणि हास्य असेल,” असं कॅप्शन दिलं आहे. सईच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे.
Video: सोनाली बेंद्रेला ‘बाईपण भारी देवा’चं कौतुक, म्हणाली, “५० दिवस बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट...”
सईने नोव्हेंबर २०२०मध्ये तीर्थदीप रॉयबरोबर लग्नाच्या बेडीत अडकत नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. सईने बंगाली आणि मराठी अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं होतं. तिच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती. आता लग्नानंतर दोन वर्षांनी सई आणि तीर्थदीप आईबाबा होणार आहेत.