'सहकलाकारांनी माझं रॅगिंग केलं'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई रानडेने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 16:52 IST2023-08-08T16:52:28+5:302023-08-08T16:52:57+5:30

saii ranade: सहकलाकारांनी केलेल्या रॅगिंगमुळे सई डिप्रेशनमध्ये गेली होती.

marathi-actress-sai-ranade-in-depression-talk-about-famous-serial-co-actor-raging-her | 'सहकलाकारांनी माझं रॅगिंग केलं'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई रानडेने केला मोठा खुलासा

'सहकलाकारांनी माझं रॅगिंग केलं'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई रानडेने केला मोठा खुलासा

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सई रानडे (saii ranade). 'देवयानी' या गाजलेल्या मालिकेतून सई नावारुपाला आला. उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे चर्चेत येणाऱ्या सईने नुकताच सिनेविश्वाविषयी एक मोठा खुलासा केला आहे. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी तिचं रँगिंग केलं असं तिने एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

सई सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे अभिनेत्री समिधा गुरु, मृणाल देशपांडे आणि भार्गवी चिरमुले यांच्यासह ती कायम माहोल मुली या नावाने वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट करत असते. या माहोल मुली प्रमाण मराठी भाषेतील शब्द वऱ्हाडी भाषेत कशा प्रकारे उच्चारतात किंवा, त्यांना पर्यायी शब्द काय आहेत हे सांगत असतात. त्यामुळ त्यांचा हा ग्रुप सोशल मीडियावर चांगलाच फेमस आहे. अलिकडेच त्यांच्या या ग्रुपने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सईने तिला कलाविश्वात कशा प्रकारे रँगिगचा सामना करावा लागला हे सांगितलं.

"ज्यावेळी मी सिनेसृष्टीत पदार्पण केलं तेव्हा माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या माझ्या सहकलाकारांनी माझी रॅगिंग केली. यात भार्गवी चिरमुले नव्हती. पण, या सगळ्याला मी इतकी कंटाळले होते की सिनेसृष्टी सोडून मी पुण्याला जाण्याच्या विचारात होते. त्यावेळी मी डिप्रेशनमध्ये होते", असं सई म्हणाले.

पुढे ती म्हणते,  "याचा मी इतका धसका घेतला की त्यानंतर मी कोणाशीही मैत्री करायला आले नाही. मी इतकंच ठरवलं होतं की, माझं माझं काम करणार आणि बाजूला होणार. माझ्या ठेवणीतील मित्र-मैत्रिणी वेगळे, माझा नवरा आहे, कुटुंब आहे आणि त्यातच मी खूप आनंदी होते. मी पहिल्यांदा जेव्हा 'पुढचं पाऊल' मालिकेच्या सेटवर गेले, तेव्हा तिथे बरीच वर्ष सिनेसृष्टीत काम करणारे कलाकार होते. त्यामुळे या सर्वांसमोर आपल्याला नीट काम करायला हवं. नाहीतर इथेही आपलं रॅगिंग होऊ शकतं असंच मला वाटायचं. भार्गवी चिरमुलेसोबत मी जेव्हा पहिली मालिका केली त्यावेळी इतर सहकलाकारांनी मला खूप त्रास दिला. त्यावेळी मी या सर्वांपासून थोडी लांब राहायचे. तेव्हा मला असं वाटायचं की माझंच सगळं चुकतंय. पण, कालांतराने माझी आणि भार्गवीची मैत्री झाली." दरम्यान, सईने वहिनीसाहेब, ‘बंड्या आनी बेबी’, स्पंदन, पकडा पकडी आणि लक्ष्मी तुझ्याविना यांसारख्या काही मालिका, सिनेमांमध्ये झळकली आहे. 
 

Web Title: marathi-actress-sai-ranade-in-depression-talk-about-famous-serial-co-actor-raging-her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.