अतुल परचुरेंसोबतच्या 'या' चिमुकलीचा लग्नसोहळा कलाविश्वात होता विशेष गाजला; तुम्ही ओळखलं का तिला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 08:00 IST2023-03-09T08:00:00+5:302023-03-09T08:00:00+5:30
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'व्यक्ती आणि वल्ली' या मालिकेतील आहे.

अतुल परचुरेंसोबतच्या 'या' चिमुकलीचा लग्नसोहळा कलाविश्वात होता विशेष गाजला; तुम्ही ओळखलं का तिला?
सध्याच्या काळात प्रत्येक सेलिब्रिटी थेट चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे या कलाकारांचा बराचसा वेळ सोशल मीडियावर जातो. यात बरेचसे कलाकार त्यांच्या जीवनातील लहानमोठे अनुभव, प्रसंग वा किस्से शेअर करत असतात. यात बऱ्याचदा ते त्यांच्या जुन्या आठवणींनाही उजाळा देतात. यात सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे ही चिमुकली नक्की कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'व्यक्ती आणि वल्ली' या मालिकेतील असून त्यात अभिनेता अतुल परचुरे (atul parchure) दिसत आहेत. तसंच त्यांच्या सोबत एक लहान मुलगीदेखील दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी ही मुलगी पाहिल्यावर अनेकांना ती कोण असावी असा प्रश्न पडला आहे. तर, या व्हिडीओमध्ये दिसत असलेली चिमुकली दुसरी-तिसरी कोणी नसून अभिनेत्री सखी गोखले (sakhi gokhale) आहे.
सखीने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच आपल्या अभिनयाची सुरुवात बालकलाकार म्हणून झाली होती असंही तिने आवर्जुन सांगितलं आहे. 'अगदी सुरुवातीलाच जाऊया... नुकताच हा व्हिडिओ सापडला. वाटलं की तुमच्यासोबत माझा स्क्रीन डेब्यू शेअर करावा. झी मराठीवरची व्यक्ती आणि वल्ली मालिका', असं कॅप्शन सखीने या पोस्टला दिलं आहे.
दरम्यान, 'व्यक्ती आणि वल्ली' या मालिकेत अतुल परचुरे यांनी पु.ल.देशपांडे यांची भूमिका साकारली होती. तर, सखीने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. लहानपणापासून अभिनयाचं बाळकडू प्यायलेली सखी आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून 'दिल दोस्ती दुनियादारी' मधील तिची भूमिका विशेष गाजली. सखीने अभिनेता सुव्रत जोशीसोबत लग्नगाठ बांधली. अत्यंत साध्या पद्धतीने पण पारंपरिक पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला होता. त्यामुळे सखी-सुव्रतच्या लग्नाची कलाविश्वात चांगलीच चर्चा रंगली होती.