समृद्धी केळकर जेजुरीगडावर झाली नतमस्तक; शेअर केले देवदर्शनाचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 16:15 IST2024-03-26T16:14:49+5:302024-03-26T16:15:23+5:30
Samruddhi kelkar: समृद्धीने इन्स्टाग्रामवर जेजुरी गडावरील फोटो शेअर केले आहेत.

समृद्धी केळकर जेजुरीगडावर झाली नतमस्तक; शेअर केले देवदर्शनाचे फोटो
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर (samruddhi kelkar). 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेच्या माध्यमातून समृद्धीने बरीच लोकप्रियता मिळवली. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. समृद्धी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात रहात असते. नुकतंच तिने जेजुरीला जाऊन देवदर्शन केलं आहे. याचे काही फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या समृद्धीने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. समृद्धीने तिच्या कुटुंबासह जेजुरी गडाचं दर्शन घेतलं आहे. या देवदर्शनाच्या वेळी समृद्धीने छान साडी नेसून सिंपल लूक केला होता.
दरम्यान, यळकोट यळकोट जय मल्हार असं म्हणत समृद्धीने हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या फोटोवर सध्या नेटकरी कमेंटचा पाऊस पाडत आहेत. समृद्धीने काही मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. तसंच ढोलकीच्या तालावर या डान्स रिअॅलिटी शोमध्येही ती झळकली आहेत.