"आपलं नातं आपल्यालाच माहीत, कारण लोकांनी...", समृद्धी केळकरची अक्षय केळकरसाठी खास पोस्ट
By कोमल खांबे | Updated: March 16, 2025 12:07 IST2025-03-16T12:06:34+5:302025-03-16T12:07:18+5:30
आज अक्षयचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री समृद्धी केळकर हिने खास पोस्ट शेअर केली आहे.

"आपलं नातं आपल्यालाच माहीत, कारण लोकांनी...", समृद्धी केळकरची अक्षय केळकरसाठी खास पोस्ट
अक्षय केळकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'बिग बॉस मराठी'मुळे तो प्रसिद्धीझोतात आला. अनेक मालिका आणि काही सिनेमांमध्येही त्याने काम केलं आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदी मालिकांमध्येही अक्षय दिसला. आज अक्षयचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री समृद्धी केळकर हिने खास पोस्ट शेअर केली आहे.
अक्षयच्या वाढदिवसानिमित्त समृद्धीची खास पोस्ट
आपलं नातं खरं तर आपल्यालाच माहित..कारण लोकांनी आपल्याला कलाकार म्हणून ओळखण्याआधी पासून आपण एकमेकांना ओळखतो.काय कसं केव्हा ह्याची उत्तर काही महत्वाची नाहीत,महत्वाचं काय आहे ती म्हणजे आपली मैत्री. जी आधी ही होती आजही आहे आणि कायम असणार आहे .
अभिनय क्षेत्रातली माझ्या आयुष्यातली पहिली ऑडिशनही तू म्हणालास म्हणून दिलेली आणि त्याच audition, मालिकेमुळे मला अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली. तेव्हापासून आजवर पुन्हा कधी मागे फिरायचा विचार केला नाही आणि जेव्हा कधी तो आला तेव्हा माझ्याआधी तू त्याला पळवून लावलंस.
मित्र कितीही प्रेमळ असला , तरीही तो कर्तृत्ववान असला तर अभिमान थोडा जास्त असतो. तू आजवर हिंदी सिरियल्स, बिगबॉस, मराठी सिरियल, चित्रपट असं बरंच कमाल कमाल काम केलं आहेस. पण त्याहूनही बऱ्याच जणांना जे जमत नाही असं मुंबईत स्वतःचं घर, गाडी...एकूण सगळंच करून मोकळा झाला आहेस. ह्याचा तुझी जवळची हक्काची मैत्रीण म्हणून प्रचंड अभिमान वाटतो.
लोकांना तू इंडस्ट्रीत कसा आहेस , पर्सनल लाईफमध्ये कसा आहेस,वगैरे काहीही,कसही वाटू दे . आम्हाला माहीत आहे. अक्षय केळकर कसा आहे….शिवराळ असलास तरी माझ्या बाबांनंतर मला समजून घेणारा, मला माझ्यापेक्षा जास्त ओळखणारा , m just a call away या वाक्याला प्रत्येक वेळी खरं ठरवणारा, काळजी घेणारा माणूस ,मित्र अजून कोणी भेटला नाही.❤️
एवढ्या वर्षांची ओळख पण खूप कमी काम केलं एकत्र...येणाऱ्या वर्षांत बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये एकत्र काम करूच. आता लवकरच तुझा नवीन चित्रपट येतोय त्यासाठी तुला कमाल भरभरून शुभेच्छा…आणि ह्या सगळ्यासोबत वाढणाऱ्या वयाची आठवण करून देणाऱ्या तुझ्या वाढदिवसाच्या ही तुला अनंत शुभेच्छा!
(या वर्षी मी नक्की तुला dance शिकवणार .. promise 🤭😛)
बाकी तू कमाल आहेस आणि कायम तसाच कमाल रहा!!!!
समृद्धीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत अक्षयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, अक्षय केळकर लवकरच 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो संत निवृत्ती नाथांच्या भूमिकेत दिसणार आहे.