येवा कोकण आपलोच आसा! ऐश्वर्या नारकर रमल्या गावाकडच्या वातावरणात; साधेपणाने वेधलं लक्ष  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 17:35 IST2024-12-23T17:31:34+5:302024-12-23T17:35:32+5:30

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ नेटकऱ्यांंचं लक्ष वेधून घेत आहे.

marathi actress satvya mulichi satvi mulgi fame aishwarya narkar shared vacation video of kokan on social media netizens react | येवा कोकण आपलोच आसा! ऐश्वर्या नारकर रमल्या गावाकडच्या वातावरणात; साधेपणाने वेधलं लक्ष  

येवा कोकण आपलोच आसा! ऐश्वर्या नारकर रमल्या गावाकडच्या वातावरणात; साधेपणाने वेधलं लक्ष  

Aishwarya Narkar:ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) या मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. आजही कलाविश्वात त्यांचं नाव मोठ्या अदबीने घेतलं जातं. गेली अनेक वर्षे त्यांनी अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मराठी सिनेसृष्टीला त्यांनी अनेक  सुपरहिट सिनेमे दिले. सध्या त्या झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेमुळे चर्चेत होत्या.  या मालिकेत ऐश्वर्या नारकर यांनी खलनायिकेचं पात्र साकारलं होतं. त्यांनी साकारलेल्या या पात्राला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. दरम्यान, या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यानंतर आता ऐश्वर्या नारकर कोकणात (konkan) गेल्या आहेत. याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.


अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर त्यांच्या रील्स आणि फोटोशूटमुळे कायमच चर्चेत येत असतात. त्यांचे हटके व्हिडीओ, फोटो नेटकऱ्यांची पसंती देखील मिळते. अशातच नुकताच त्यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका संपल्यानंतर ऐश्वर्या नारकर यांनी कोकणाची वाट धरल्याचं पाहायला मिळतंय.  याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केलाय. गावाकडे चुलीसमोर बसून ऐश्वर्या यांनी हा व्हिडीओ शूट केला आहे. 'कोकण व्हाईब्स' आणि हार्ट इमोजी त्यांनी या व्हिडीओवर दिला आहे. शिवाय 'फील' असं कॅप्शन देखील लिहिलं आहे.

ऐश्वर्या नारकर यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. शिवाय त्यांच्या साधेपणाचं कौतुक देखील केलं आहे. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने "खूप छान वाटलं मॅडम! तुम्हाला असं चूलीपाशी बसलेले बघून, आम्हाला आमचे पूर्वीचे गावातले, शाळेत असतानाचे ते दिवस आठवले..." अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका यूूजरने "लय भारी मॅडम.."अशी प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय. 

Web Title: marathi actress satvya mulichi satvi mulgi fame aishwarya narkar shared vacation video of kokan on social media netizens react

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.