"ज्या देवामुळे आज आपल्या देव्हाऱ्यात...", शिवजयंतीनिमित्त मराठी अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:28 IST2025-02-19T13:24:56+5:302025-02-19T13:28:56+5:30
संपूर्ण देशभरात आज शिवजयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे.

"ज्या देवामुळे आज आपल्या देव्हाऱ्यात...", शिवजयंतीनिमित्त मराठी अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
Megha Dhade: संपूर्ण देशभरात आज शिवजयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने सगळीकडे तयारी सुरू झाली असून अनेक शहरांमध्ये भव्य मिरवणूका काढल्या जातात. याशिवाय विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. त्यामुळे सगळीकडे शिवमय वातावरण झालं आहे. दरम्यान, सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. शिवजयंतीच्या निमित्ताने मराठी अभिनेत्री मेघा धाडेने (Megha Dhade) सुद्धा सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.
मेघा धाडेने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय, "ज्या देवामुळे आज आपल्या देव्हाऱ्यात देव शाबूत आहेत त्या देवाला कधीही विसरू नका, त्या देवाने दिलेली शिकवण. देव देश आणि धर्म कधीही विसरू नका. त्याने दाखवलेल्या मार्गावर सतत चालत राहा. कारण, हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा..., जय शिवराय जय हिंद...! शिवजयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा...! अशा पोस्ट अभिनेत्रीने लिहिली आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते व्यक्त होताना दिसत आहेत.
दरम्यान, मेघा धाडेने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'बिग बॉस’ मराठीच्या पहिल्या पर्वाची ती विजेती ठरली होती. सध्या मेघा धाडे झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली मालिकेत काम करताना दिसते आहे. तिने मिळवलेल्या यशाने आज तिचा चाहता वर्गदेखील फार मोठा आहे.