आमच्याच हक्काचा पैसा भिक मागितल्यासारखा मागायचा का? अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 11:03 AM2021-02-22T11:03:17+5:302021-02-22T11:12:54+5:30

गेली १३ वर्ष कलाक्षेत्रात काम करतेय. आजपर्यंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बुडवले नाहीत.. !  दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर केला कलाकारांचे पैसे थकवल्याचा गंभीर आरोप

marathi actress sharmishtha raut allegations on director producer mandar devasthali | आमच्याच हक्काचा पैसा भिक मागितल्यासारखा मागायचा का? अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची पोस्ट चर्चेत

आमच्याच हक्काचा पैसा भिक मागितल्यासारखा मागायचा का? अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची पोस्ट चर्चेत

googlenewsNext
ठळक मुद्देमृणाल दुसानीस,संग्राम साळवी , विदिशा म्हसकर या कलाकारांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत शर्मिष्ठा पाठिंबा दिला आहे.

‘बिग बॉस मराठी’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे ख-या अर्थाने प्रकाशझोतात आलेली मराठमोळी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिची एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. होय, काल शर्मिष्ठाने ही पोस्ट शेअर केली आणि सगळीकडे खळबळ माजली. या पोस्टमध्ये शर्मिष्ठाने प्रसिद्ध  दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आहे. कृपया बोला, घाबरू नका, असेही तिने म्हटले आहे.
‘हे मन बावरे’ या मालिकेत सध्या शर्मिष्ठा काम करतेय. निर्मात्याने याच मालिकेचे पैसे थकवल्याचे तिने म्हटले आहे.
‘गेली 13 वर्षे कलाक्षेत्रात काम करतेय. आजपर्यंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बुडवले नाहीत. आजही आणि यापूर्वीही पण कायम चॅनलने आम्हाला मदत केली. परंतु एक प्रसिद्ध निर्माता मंदार देवस्थळी, त्याने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ ह्यांंचे पैसे थकवले. हे कोणत्याही क्षेत्रात होऊ शकत. कृपया घाबरू नका... बोला... पाठींबा द्या आणि आमच्यासाठी प्रार्थना करा,’ अशा कॅप्शनसह शर्मिष्ठाने ही पोस्ट शेअर केली आहे.


 
 पोस्टमध्ये ती म्हणते...
आम्ही कलाकार चॅनल कोणतही असो, निर्माता कोणीही असो आम्ही कलाकार नेहमीच आमच्याकडून चांगलं काम व्हावं या हेतूने मेहनत घेत असतो. उत्तम काम आणि ते केल्यावर योग्य मोबदला हाच हेतू असतो आणि तो असावा. पण काम करूनही त्याचा पैसा वेळेवरच न मिळणे, योग्य आहे? अनेक वेळा अस होत की, आपण खूप प्रामाणिकपणे आपले काम(शूटींग) करतो. आपल प्रोजेक्ट हे आपल बाळ आहे आणि प्रॉडक्शन हाऊस हे आपल घर अस समजून वेळेची, परिस्थितीशी, घरच्यांशी, प्रॉडक्शन हाऊसकडून न मिळणाºया गोष्टींशी, प्रॉडक्शन हाऊसच्या मिसमॅनेजमेंटशी तडजोड करून सर्व तंत्रज्ञ आणि कलाकार अविरत काम करत असतात. चॅनलचा उत्तम सपोर्ट असूनही निर्माता कामाचा योग्य तो मोबदला देत नाहीत. अनेक कारणं वारंवार मिळत असतात...आम्ही मात्र निर्माता जगला तर कलाकार जगला या तत्त्वाअंतर्गत काम करत असतो. मग वेळच्या वेळी चॅनलकडून पैसे येऊन पण कलाकारांना आणि तंत्रज्ञानांना पैसे निर्मात्याकडून न मिळण हे योग्य आहे का? कलर्स मराठीने आम्हा कलाकारांना, तंत्रज्ञानांना वेळोवेळी पैसे मिळवून देण्यासाठी मदत केली. परंतु आमच्या निर्मात्याने कोणालाही पैसे दिले नाही... निर्मात्याच्या अडिअडचणींच्या वेळेस, एपिसोडची बँक नाही म्हणून किंवा कधी कधी निर्मात्यांकडे कॉस्च्युम्स नाही म्हणून घरून आपले कॉस्च्युम्स आणून शूटींगचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मदत करणे आता चूक आहे का? आपल्याच मेहनतीचा हक्काचा पैसा मोबदला भिक मागितल्यासारखा सतत मागत राहणे हे योग्य आहे का? असा सवाल शर्मिष्ठाने केला आहे.

दरम्यान मृणाल दुसानीस, संग्राम साळवी , विदिशा म्हसकर या कलाकारांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत शर्मिष्ठा पाठिंबा दिला आहे.  त्यांचेही पैसे थकवल्याचा आरोपही या कलाकारांनी निर्मात्यांवर केला आहे. मंदार देवस्थळी हे मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील मोठे नाव आहे.  मंदार देवस्थळी यांनी आतापर्यंत अनेक मराठी मालिका दिग्दर्शित केल्या आहेत. यामध्ये बोक्या सातबंडे, आपली माणसं, झुंज, आभाळमाया, किमयागार, वसुधा, वादळवाट, अवघाची संसार, होणार सून मी या घरची,  माझे पती सौभाग्यवती  अशा मालिकांचा समावेश आहे.
 

Web Title: marathi actress sharmishtha raut allegations on director producer mandar devasthali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.