फोटोतील चिमुकलीला ओळखलं का? 'मन उडू उडू..'मध्ये साकारतीये देशपांडे सरांच्या लेकीची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 07:00 IST2022-06-06T07:00:00+5:302022-06-06T07:00:01+5:30
Sharvari kulkarni: कलाकार मंडळी त्यांच्या सुरु असलेल्या प्रोजेक्टविषयी, अपकमिंग प्रोजेक्टविषय़ी वा वैयक्तिक आयुष्याचे अपडेट्स देत असतात. सध्या सोशल मीडियावर मन उडू उडू झालं या मालिकेतील अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो व्हायरल होत आहे.

फोटोतील चिमुकलीला ओळखलं का? 'मन उडू उडू..'मध्ये साकारतीये देशपांडे सरांच्या लेकीची भूमिका
कलाविश्वातील प्रत्येक सेलिब्रिटीचा स्वतंत्र एक चाहतावर्ग असतो. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकाराविषयीचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यामध्येच कलाकारदेखील सातत्याने चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. यात अनेकदा ही कलाकार मंडळी त्यांच्या सुरु असलेल्या प्रोजेक्टविषयी, अपकमिंग प्रोजेक्टविषय़ी वा वैयक्तिक आयुष्याचे अपडेट्स देत असतात. सध्या सोशल मीडियावर मन उडू उडू झालं या मालिकेतील अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेकांना ती नेमकी कोण असावी असा प्रश्न पडला आहे.
अनेकदा ही कलाकार मंडळी त्यांच्या कुटुंबासोबत वा बालपणीचे काही फोटो शेअर करत चाहत्यांसोबत जुन्या आठवणी शेअर करत असतात. यावेळी मन उडू उडू झालं या मालिकेतील एका अभिनेत्रीने तिचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पाहिल्यावर तिला ओळखणं कठीण झालं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी हिचा आहे. शर्वरी सध्या मन उडू उडू झालं या मालिकेत दिपूच्या दीदीची भूमिका साकारत आहे. शर्वरीचा हा बालपणीचा फोटो पाहिल्यावर अनेकांनी तिला ओळखलं नाही, शर्वरी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.