"त्यांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला", सिनेइंडस्ट्रीत मराठमोळ्या अभिनेत्रीला आला वाईट अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 10:57 AM2024-09-06T10:57:00+5:302024-09-06T10:57:29+5:30

"तुला मला खूश करायचं आहे", अंगूरी भाभीने सांगितलं सिनेइंडस्ट्रीचं धक्कादायक वास्तव

marathi actress shilpa shinde shared horrifying incidence revealed filmmaker harrassed her | "त्यांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला", सिनेइंडस्ट्रीत मराठमोळ्या अभिनेत्रीला आला वाईट अनुभव

"त्यांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला", सिनेइंडस्ट्रीत मराठमोळ्या अभिनेत्रीला आला वाईट अनुभव

शिल्पा शिंदे ही टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या शिल्पाला 'भाभीजी घर पर है' या मालिकेने प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारून शिल्पा घराघरात पोहोचली. शिल्पाने मालिकांबरोबरच काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात शिल्पाला सिनेइंडस्ट्रीत वाईट अनुभव आला होता. याबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने भाष्य केलं. 

ऑडिशनला गेलेल्या शिल्पा शिंदेवर दिग्दर्शकाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत शिल्पाने हा प्रसंग सांगितला.  शिल्पा म्हणाली, "१९९८-९९ ची गोष्ट आहे जेव्हा मी इंडस्ट्रीत स्ट्रगल करत होते. मी त्यांचं नाव घेणार नाही. पण ते मला म्हणाले की तू हे कपडे घाल आणि सीन कर. मी ते कपडे घातले नाहीत. त्यांनी मला सांगितलं की सीनमध्ये ते माझे बॉस आहेत आणि त्यांना मला खूश करायचं आहे. तेव्हा मला काही कळत नव्हतं. त्यामुळे मी तो सीन केला. त्यांनी माझ्याबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मी खूप घाबरले. मी त्यांना धक्का दिला आणि तेथून पळ काढला. सुरक्षा कर्मचाऱ्यांना समजलं की काय घडलं आहे. त्यामुळे त्यांनी मला तिथून लगेच जायला सांगितलं". 


"ते हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत. मी हा सीन करायला तयार झाले कारण ते एक अभिनेताही होते. मी खोटं बोलत नाहीये. पण, त्यांचं नाव मी घेऊ शकत नाही. त्यांना माझ्यापेक्षा छोटी मुलं आहेत. आणि जर मी नाव घेतलं तर त्यांनाही त्रास होऊ शकतो. काही वर्षांनंतर मी पुन्हा त्यांना भेटले. त्यांनी कदाचित मला ओळखलं नसेल. त्यांनी मला सिनेमात एक भूमिकाही ऑफर केली होती. पण, मी तो रोल नाकारला", असंही शिल्पाने सांगितलं. 

शिल्पाने इंडस्ट्रीमधील हे भयानक वास्तव प्रत्येकाबरोबर घडतं, असंही सांगितलं. ती म्हणाली, "हे प्रत्येकाबरोबर होतं. काही जणांना माझ्याप्रमाणे सुटका करून घेता आली. अनेकांनी मला सांगितलं आहे की अशा प्रसंगाचा सामना त्यांनाही करावा लागला आहे. मला असं वाटतं की तुम्हाला याबाबत विचारणा झाली तर तुम्हाला ठामपणे नाही म्हणता आलं पाहिजे". 

Web Title: marathi actress shilpa shinde shared horrifying incidence revealed filmmaker harrassed her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.