'मला गाव सुटना....'; गावच्या मातीत रमली शिवाली परब, शेअर केला शेतातील फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 18:14 IST2024-03-15T18:13:40+5:302024-03-15T18:14:17+5:30
Shivali parab: शिवालीने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती शेतात वावरतांना दिसत आहे.

'मला गाव सुटना....'; गावच्या मातीत रमली शिवाली परब, शेअर केला शेतातील फोटो
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) हा कार्यक्रम सध्या छोट्या पडद्यावर विशेष गाजत आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासह त्यातील कलाकारही सोशल मीडियावर कायम चर्चिले जातात. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री शिवाली परब (shivali parab) हिची चर्चा रंगली आहे.
शिवालीचा आज मोठा चाहतावर्ग असून तिची तरुणाईमध्ये विशेष क्रेझ आहे. त्यामुळे तिच्याविषयीचे प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होतात. सध्या नेटकऱ्यांमध्ये शिवालीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात ती तिच्या गावी पोहोचल्याचं दिसून येत आहे.
शिवालीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या गावी गेल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही तर ती छान शेतामध्ये भटकंती करतानाही दिसून येत आहे. त्यामुळेच 'काय सांगू राणी मला गावं सुटं ना, कसं सांगू राणी मला गावं सुटं ना', हे गाणं सुद्ध बॅकग्राउंडला प्ले केलं आहे.
दरम्यान, शिवाली मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मूळची कल्याणची असलेल्या शिवालीने उत्तम अभिनयकौशल्याच्या जोरावर मराठी कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. शिवाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते.