शिवानी बावकरने घेतला घर सोडायचा निर्णय; व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 18:16 IST2022-02-07T18:15:13+5:302022-02-07T18:16:43+5:30
Shivani baokar: अलिकडेच शिवानीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती घर सोडून पळून जात असल्याचं सांगत आहे.

शिवानी बावकरने घेतला घर सोडायचा निर्णय; व्हिडीओ होतोय व्हायरल
'लागीरं झालं जी' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर. या मालिकेत शिवानीने शितली ही भूमिका साकारुन तुफान लोकप्रियता मिळवली. विशेष म्हणजे गेल्या काही काळात शिवानीचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे. यात अनेकदा ती तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफविषयीचे अपडेट्सदेखील देत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
अलिकडेच शिवानीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती घर सोडून पळून जात असल्याचं सांगत आहे. विशेष म्हणजे तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तो वाऱ्यासारखा पसरला आहे.
काय आहे शिवानीच्या व्हिडीओमागील सत्य
सध्या सोशल मीडियावर असंख्य ट्रेंड व्हायरल होत आहेत. यापैकीचं एक ट्रेंड शिवानीने फॉलो केला आहे. 'जब वी मेट' या चित्रपटातील गीतचा म्हणजेच करीना कपूरचा एक सीन शिवानीने रिक्रिएट केला आहे. यात ती फोनवर शाहिद कपूरला मी घर सोडून जात असल्याचं सांगत आहे.
दरम्यान, शिवानीने खरोखर घर सोडायचा निर्णय घेतला नसून केवळ मजेचा भाग म्हणून हा व्हिडीओ शूट केला आहे. परंतु, तिच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. शिवानी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून सध्या ती कुसुम या मालिकेत काम करत आहे.