कुलकर्णींच्या सुनेचा नवा लुक, अभिनेत्री शिवानी रांगोळे हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘ब्युटिफुल’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 16:54 IST2022-08-24T16:53:07+5:302022-08-24T16:54:36+5:30
Shivani Rangole : सध्या कुलकर्णींच्या सुनेची जोरदार चर्चा आहे. होय, कारण आहे शिवानीचा नवा लुक...

कुलकर्णींच्या सुनेचा नवा लुक, अभिनेत्री शिवानी रांगोळे हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘ब्युटिफुल’!!
अभिनेत्री शिवानी रांगोळे ( Shivani Rangole ) एक लोकप्रिय अभिनेत्री. काही महिन्यांआधीच शिवानीचं लग्न झालं. अभिनेता विराजस कुलकर्णीसोबत तिने लग्नगाठ बांधली. सध्या मात्र कुलकर्णींच्या या सुनेची जोरदार चर्चा आहे. होय, कारण आहे शिवानीचा नवा लुक.
होय, शिवानीने नवा हेअरकट केला आहे. तिने तिचे केस आणखी शॉर्ट केले आहेत. या नव्या लुकमधले अनेक फोटो शिवानीने शेअर केले आहेत. यात ती कमालीची सुंदर दिसतेय. चाहते तिच्या या लुकवर फिदा झाले आहेत.
तिचा हा नवा लुक सहज म्हणून आहे की नव्या प्रोजेक्टची तयारी हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण सध्या तिच्या या लुकची जोरदार चर्चा आहे. तुम्हालाही शिवानीचा हा नवा लुक आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा.
शिवानी रांगोळे हिने झी मराठी वाहिनीवरील ‘शेजारी शेजारी’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने महुआ हिची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती फुंतरू आणि अॅण्ड जरा हटके चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. स्टारप्रवाह वरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत शिवानीने रमाबाईची भूमिका साकारली होती.
शिवानी ही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. स्वत:चे वेगवेगळे फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.