हनिमूनला गेलेल्या शिवानीची विराजसने केली फजिती; अभिनेत्रीला वाटते 'या' गोष्टीची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 14:00 IST2023-07-27T14:00:14+5:302023-07-27T14:00:42+5:30
Shivani rangole: लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी शिवानी आणि विराजस मालदीवला सेकंड हनिमूनसाठी गेले होते.

हनिमूनला गेलेल्या शिवानीची विराजसने केली फजिती; अभिनेत्रीला वाटते 'या' गोष्टीची भीती
गेल्या वर्षी मराठी कलाविश्वातील अनेक जोड्या लग्नबंधनात अडकल्या. त्यातलीच एक जोडी म्हणजे शिवानी रांगोळे (shivani rangole) आणि विराजस कुलकर्णी (virajas kulkarni). पडद्यावर एकत्र न झळकलेली ही जोडी पडद्यामागे मात्र तुफान हिट आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी बरेचदा रंजक किस्से चर्चिले जातात. सध्या या जोडीच्या हनिमूनचा एक किस्सा चर्चेत आला आहे. हनिमुनला गेलेल्या शिवानीला विराजसने चांगलंच घाबरवलं होतं. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत तिने हा किस्सा सांगितला.
लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी शिवानी आणि विराजस मालदीवला सेकंड हनिमूनसाठी गेले होते. परंतु, यावेळी तिची चांगलीच घाबरगुंडी उडाली. शिवानीने नुकतीच तेथील एक आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
खवळलेल्या समुद्राची प्रचंड भिती वाटते. मात्र, तरीसुद्धा विराजसमुळे ती स्पीड बोटीमध्ये बसली. या स्पीडबोटची विराजस चांगली मज्जा घेत होता. पण, शिवानी मात्र, जीव मुठीत घेऊन बसली होती. ती सतत विराजसला, अजून किती वेळ, अजून किती वेळ असा प्रश्न विचारत होती. तर विराजसही मुद्दाम तिला हसून अजून घाबरवत होता.
दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करत हनिमूनला मालदीवला आलेलं कपल कसं असतं तर आमच्याकडे पाहा असं तिने म्हटलं आहे. सोबतच, “एका हनिमूनची दुसरी गोष्ट! हो मला समुद्राची भीती वाटते, जर तो शांत नसेल तर..!!”, असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. शिवानी आणि विराजसने गेल्या वर्षी २००२ मध्ये अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर लग्न केलं. शिवानी सध्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. तर विराजस ‘सुभेदार’ या चित्रपटात झळकणार आहे.