"तुझ्यासारखा मित्र कोणालाही मिळू नये", कुशल बद्रिकेबद्दल श्रेया बुगडे असं का म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 12:50 PM2023-07-21T12:50:40+5:302023-07-21T12:51:35+5:30
श्रेयाच्या बुगडेच्या 'त्या' पोस्टवर कुशल बद्रिकेची कमेंट, म्हणाला, "फायनली मला कळलं..."
अभिनय आणि विनोदाची उत्तम सांगड घालत अभिनेत्री श्रेया बुगडेने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. मराठी कलाविश्वातील कॉमेडी क्वीन अशी ओळख श्रेयाने मिळवली. श्रेयाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा श्रेया आगामी प्रोजेक्टबाबत पोस्टमधून माहिती शेअर करताना दिसते. सध्या श्रेयाने अभिनेता कुशल बद्रिकेबद्दल केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
मराठमोळा अभिनेता कुशल बद्रिकेचा नुकताच वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवसानिमित्त श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर करत मजेशीर पोस्ट लिहिली होती. "हॅपी बर्थडे कुशल...तुझी अलंकारिक भाषेतली आयुष्याची फिलोसॉफी आणि तुझे टुकार विनोद, मी कितीही बोअर झाले तरी आयुष्यभर ऎकत राहेन न कंटाळता ...हे माझं वचन आहे...तुझ्यासारखा मित्र कोणालाही मिळू नये!", असं श्रेयाने पोस्टमध्ये म्हटलं होतं. श्रेयाच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
श्रेयाच्या या पोस्टवर कुशल बद्रिकेने कमेंटही केली आहे. "मी विचार करतोय की जास्त डेंजर काय आहे? अलंकारिक भाषेतली फिलोसॉफी का मग टुकार विनोद? फायनली मला कळलंय की फिलोसॉफी ही सॉफी करून सांगता येणार नाही. त्यामुळे ते जास्त डेंजर आहे. तरीही तुला ऑप्शन नाही आणि तू प्रॉमिस केली होतीस तशीच ही पोस्ट आहे का ? हा विचार मी करतोय", अशी कमेंट कुशलने केली आहे.
दरम्यान, कुशल आणि श्रेया एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे मजेशीर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या ते 'चला हवा येऊ द्या' शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.