११ महिने इस्टाग्रामवरुन गायब होती मराठी अभिनेत्री, नवीन मोबाईल घेतला अन् जुन्यामधून...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 10:46 AM2023-04-19T10:46:45+5:302023-04-19T10:48:19+5:30
सेलिब्रिटींसाठी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणं फार महत्वाचं असतं. पण या मराठी अभिनेत्रीसोबत घडलं असं काही की...
आजकाल सोशल मीडियावर कोणाचं अकाऊंट नसेल असं होणार नाही. प्रत्येक जण फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया साईट्सवर अॅक्टिव्ह असतात. सेलिब्रिटींसाठी तर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणं फार महत्वाचं असतं. अनेकदा त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट, त्यावरील फॉलोअर्स हे बघून त्यांना प्रोजेक्ट्स मिळतात. पण एक मराठी अभिनेत्री अशी आहे जी जवळपास १ वर्ष इन्स्टाग्रामवर नव्हती. याचं कारण म्हणजे तिच्या नवीन मोबाईलमध्ये अकाऊंटच सुरु होत नव्हतं. नेमका काय प्रकार घडला ते तिने नुकतंच पोस्ट करुन सांगितलं आहे.
अभिनेत्री स्मिता शेवाळे (Smita Shewale) हिने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. तब्बल 11 महिन्यांनंतर ती इन्स्टाग्रामवर परतली आहे. मग इतके महिने ती कुठे गायब होती याचंच स्पष्टीकरण तिने दिलं आहे. स्मिता म्हणाली, '२३ मे २०२२ ते १४ एप्रिल २०२३ , जवळपास 11 महिने मी इंस्टाग्राम वर नव्हते .सुरुवातीला मला वाटलं की बरं झालं आपलं सोशल मीडियाचे एडिक्शन आहे ते ह्या मनाने सुटेल आणि त्याच विचारात पहिले तीन महिने गेले. खूप छान वाटत होतं मी लोकांना डायरेक्ट जास्त वेळ देत होते. पण पुन्हा मला instagram वर यावसं वाटलं याचं एकच कारण आहे मी अभिनेत्री आहे आणि त्यामुळे माझा येणारा प्रत्येक प्रोजेक्ट माझे चालू असलेले प्रोजेक्ट हे तुमच्यापर्यंत पोहोचावे, तुमची त्यावर काय प्रतिक्रिया आहे ती कळावी.कारण एक कलाकार म्हणून आम्हाला नेहमीच आमच्या कामाची पोचपावती हवी असते.
खरंच मी खूप खुश आहे आता मी एअरपोर्टवर ऑलमोस्ट उड्याच मारायचे बाकी राहिले होते.'
ती पुढे म्हणाली, 'आता महत्त्वाचा मुद्दा की मी इंस्टाग्राम वर का नव्हते कारण मी नवीन मोबाईल घेतला आणि तो इन्स्टॉल करत असताना जुन्या मोबाईल मधून इंस्टाग्राम लॉग आऊट करायचं राहिले होते आणि त्यानंतर काहीही केल्याने माझ्या नवीन मोबाईल मध्ये इंस्टाग्राम चालूच होत नव्हता मी माझ्या जवळपासच्या लोकांना विचारलं युट्युब वर व्हिडिओ बघितले,अनेक एक्स्पर्टची हेल्प घेतली तरी त्याचा काहीच फायदा झाला नाही. तुम्हा सगळ्यांना हेच सांगेन की आपल्यासाठी जर आपलं कोणतंही सोशल मीडिया किंवा इतर कोणतेही ॲप इम्पॉर्टंट असेल आणि जर तुम्ही डिवाइस बदलत असाल तर सगळ्यात आधी त्या ॲप मधून प्रॉपर लॉग आऊट व्हा तुमचा पासवर्ड माहिती करून घ्या आणि तो खूप सुरक्षितपणे तुमच्या नवीन नवीन मोबाईल मध्ये इंटर करा.....Happy connecting you all again'
तर नवीन मोबाईल घेतल्यावर जुन्या मोबाईलमधून सोशल मीडिया अकाऊंट लॉग आऊट करायला विसरु नका हेच स्मिताने तिला आलेल्या अनुभवातून सांगितलं. स्मिता सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' या मालिकेत जान्हवीची भूमिका साकारत आहे. स्मिताचं स्वत:चं युट्यूब चॅनलही आहे ज्यावर ती व्हिडिओ पोस्ट करत असते.