Smita Shewale : Video - "मी जगूच नाही शकणार..."; 'मुरांबा'मधील 'जान्हवी'ला निरोप देताना 'रमा' झाली भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 01:05 PM2024-06-11T13:05:09+5:302024-06-11T13:14:53+5:30
Smita Shewale And Shivani Mundhekar : स्मिता शेवाळेने आपल्या युट्यूब व्हिडिओवरुन मालिका सोडण्यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे. तसेच या व्हि़डीओमध्ये तिने सहकलाकारांसोबत कशी धमाल केली हेही सांगितलं.
मुरांबा मालिका आता उत्कांठावर्धक वळणावर आली आहे. अक्षय आणि रमा यांच्यातील प्रेमाचा आंबट गोड मुरांबा चांगलाच मुरतोय. ‘मुरांबा’ या मालिकेमध्ये शशांक केतकर (Shashank Ketkar) आणि शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) मुख्य भूमिकेत आहेत. शशांक केतकर अक्षयची भूमिका साकारतोय शिवानी मुंढेकर रमाची भूमिका साकारतेय. अभिनेत्री स्मिता शेवाळेने (Smita Shewale) मालिकेत जान्हवी ही भूमिका साकारली. तिचं हे पात्र चाहत्यांना खूपच आवडलं. पण आता अभिनेत्रीने ही मालिका सो़डल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
स्मिता शेवाळेने आपल्या युट्यूब व्हिडिओवरुन मालिका सोडण्यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे. तसेच या व्हि़डीओमध्ये तिने सहकलाकारांसोबत कशी धमाल केली हेही सांगितलं. याच दरम्यान 'मुरांबा' मधील 'जान्हवी'ला निरोप देताना 'रमा' भावूक झाली. "तुझ्यासोबत काम करताना खूप मजा आली आणि तू सर्वांची फेव्हरेट आहेस. बाहेर गेल्यावर लोक मला आधी विचारतात की रमा कशी आहे? त्यामुळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा म्हणजे रमा कशी आहे हे मला त्यांना सांगता येईल" असं स्मिता शेवाळेने म्हटलं आहे. यावर शिवानीने उत्तर दिलं.
"मी तुला खूप मिस करेन"
"काय बोलू मी... मी जगूच नाही शकणार तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्याशिवाय. तू चालली आहेस पण पुण्याला आल्यावर मला घरात घेशील. मी तुला खूप मिस करेन. तुझ्या सगळ्या गोष्टी.... तुझं हसणं, तुझं रडणं आणि आपल्या गप्पा, तुझं रागावणं सगळं मिस करेन... आय लव्ह यू" असं म्हणत शिवानी मुंढेकर भावूक झाली आहे. स्मिता शेवाळेचं स्वत:चं युट्यूब चॅनल आहे. यात ती तिचे दैनंदिन अपडेट्स देत असते. काल तिने मुरांबा मालिकेच्या सेटवरचा शेवटच्या दिवसाचा व्लॉग शेअर केला. यात तिने हा निर्णय का घेतला हेही सांगितलं.
"माझ्या आयुष्यातला खूप मोठा निर्णय आहे"
"आयुष्यात परिस्थितीनुसार काही निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. सध्या कबीर खूप लहान आहे आणि त्याला सांभाळायला कोणीही नाही. माझी आई पुण्यात असते. त्यामुळे मी पुण्याला आईच्या घराजवळच राहणार आहे जेणेकरुन ती कबीरची काळजी घेऊ शकेल आणि मी सिनेमा, वेबसीरिज येत आहेत त्याचं शूटिंग करु शकेल. मालिकेचं शूटिंग मुंबईत २० दिवस असतं आणि इथे कबीरची काळजी घेणारं कोणीही नव्हतं. हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा निर्णय आहे पण तो मी घेतला" असं स्मिता शेवाळेने म्हटलं आहे.