फोटोतील मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? अनिकेत विश्वासरावसोबत केलं होतं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 15:42 IST2023-09-13T15:40:59+5:302023-09-13T15:42:31+5:30
Marathi actress: या अभिनेत्रीमध्ये आता कमालीचा बदल झाला आहे.

फोटोतील मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? अनिकेत विश्वासरावसोबत केलं होतं लग्न
सध्या सोशल मीडियावर मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे.उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारी ही अभिनेत्री काही वर्षापूर्वी तिच्या घटस्फोटाच्या वृत्तामुळे चर्चेत आली होती. जवळपास २ वर्ष प्रयत्न केल्यानंतर तिला तिच्या पतीपासून म्हणजेच अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यापासून घटस्फोट मिळाला. विशेष म्हणजे घटस्फोटानंतर या अभिनेत्रीमध्ये कमालीचा बदल झाला आहे. सध्या तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अभिनेत्री स्नेहा चव्हाण साऱ्यांनाच ठावूक असेल. लाल इश्क, सिनिअर सिटीझन, ७०२ दीक्षित अशा काही सिनेमांमध्ये स्नेहाने काम केलं होतं. तसंच अनेक गाजलेल्या चाहिरातींमध्येही ती झळकली आहे. गेल्या काही काळात स्नेहामध्ये कमालीचा बदल झाला आहे. नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिच्यात झालेला बदल दिसून येत आहे. स्नेहाने तिचे केस एकदम बारीक कट केले आहेत. त्यामुळे तिच्या या नव्या हेअर स्टाइलची चाहत्यांमध्ये चर्चा होतीये.
स्नेहाने २०२१ मध्ये अनिकेत विश्वासराव आणि त्याच्या कुटुंबियांवर घरगुती हिंसाचार प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात मानसिक छळ, मारहाण होत असल्याचं तिने तिच्या तक्रारीत म्हटलं होतं. अनिकेतपेक्षा आपण वरचढ ठरतोय म्हणून त्याने मारहाण केल्याचं तिने आरोपपत्रात म्हटलं होतं. तर, स्नेहाने पोटगी मिळावी यासाठी हा बनाव रचल्याचं अनिकेत विश्वासरावने म्हटलं होतं. त्यानंतर २० वर्षांनी २०२३ मध्ये कोर्टाने त्यांचा घटस्फोट मान्य केला.
दरम्यान, स्नेहाप्रमाणेच तिची आई राधिका चव्हाणदेखील अभिनेत्री आहे. ‘ये है चाहतें’ या मालिकेत त्या आजीची भूमिका साकारत आहेत.