Bus Bai Bus : तुझा नवरा मला...! राधिका आपटे अर्ध्या रात्री सोनाली कुलकर्णीला झोपेतून उठवते तेव्हा...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 17:27 IST2022-10-09T17:26:49+5:302022-10-09T17:27:41+5:30
Bus Bai Bus : ‘बस बाई बस’ या शोमध्ये नुकतीच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हजेरी लावली. राधिका आपटेने तुझी झोप उडवलेली, असं आम्ही ऐकलं होतं. हे खरं आहे का? असा प्रश्न सुबोधने केला. यावर सोनाली मस्तपैकी हसली. मग तिने यामागचा किस्साही ऐकवला....

Bus Bai Bus : तुझा नवरा मला...! राधिका आपटे अर्ध्या रात्री सोनाली कुलकर्णीला झोपेतून उठवते तेव्हा...!!
‘बस बाई बस’ (Bus Bai Bus) या झी मराठीच्या शोमध्ये नुकतीच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonali Kulkarni) हजेरी लावली. मग काय, धम्माल किस्से, धम्माल उत्तरं ऐकायला मिळाली. सुबोध भावेनं विचारलेल्या प्रश्नांना सोनालीनं धम्माल उत्तरं दिलीत. तुझ्यासमोर इतर अभिनेत्रींचं कौतुक केलेलं आवडतं का? असा प्रश्न सुबोधने सोनालीला केला. यावर, हो... मराठी इंडस्ट्रीतल्या अनेक अभिनेत्री माझ्या मैत्रिणी आहेत. त्यांचं कौतुकही मला आवडतं, असं सोनाली म्हणाली. याच कार्यक्रमात सोनालीनं बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिच्याबद्दलचा एक किस्साही ऐकवला.
राधिका आपटेने तुझी झोप उडवलेली, असं आम्ही ऐकलं होतं. हे खरं आहे का? असा प्रश्न सुबोधने केला. यावर सोनाली मस्तपैकी हसली. मग तिने यामागचा किस्साही ऐकवला.
ती म्हणाली, ‘मी पुण्यात रेस्टॉरंट चित्रपटाचं शूटींग करत होते. रात्रीचं शूटींग संपवून मी घरी आले आणि गाढ झोपी गेले. तासाभरात आईने मला उठवलं. तुझी मैत्रिण आलीये, असं ती म्हणाली. मी अर्धवट झोपेतून उठले आणि बघायला गेले तर दारात एक सुंदर, गोड मुलगी उभी होती. ती राधिका आपटे होती. मी तिला ओळखत नव्हते. तू कोण? असं मी तिला थेट विचारलं. यावर मी राधिका आहे आणि संदेश (सोनालीचा नवरा) मला ओळखतो, असं ती म्हणाली. सोनाली तेव्हा इंडस्ट्रीत नवी होती. तिला मुंबईत करिअर करायचं होतं आणि यासाठी तिला माझं मार्गदर्शन हवं होतं. त्याक्षणी राधिकाच्या धाडसाचं मला खरंच कौतुक वाटलं होतं. आज ती जिथे आहे, त्याचा मला अभिमान आहे. यानंतर पुन्हा एकदा तिने माझं मार्गदर्शन घेण्यासाठी मला फोन केला होता. त्यामुळे मी माझी कॉलर ताठ करायला हवी. कारण राधिका स्ट्रगलर असताना ती माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी आली होती.’