गॅरीची रिअल लाइफ पत्नी हरवली बालपणीच्या आठवणीत; मान्सून ट्रिपमध्ये घेतला पाण्यात मनमुरादपणे भिजण्याचा आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 17:01 IST2022-07-12T16:59:58+5:302022-07-12T17:01:00+5:30
Sukhada Khandkekar: अलिकडेच तिने तिच्या मान्सून ट्रिपचे काही फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये तिच्यातील अल्लडपणा दिसून येत आहे.

गॅरीची रिअल लाइफ पत्नी हरवली बालपणीच्या आठवणीत; मान्सून ट्रिपमध्ये घेतला पाण्यात मनमुरादपणे भिजण्याचा आनंद
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिजीत खांडकेकर (abhijit khandkekar) आणि त्याची पत्नी सुखदा खांडकेकर (Sukhada Khandkekar). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर या दोघांनीही स्वत: चा स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ते कायम चर्चेत असतात. अलिकडेच सुखदा आणि अभिजीत मान्सून ट्रिपला गेले होते. येथील काही फोटो आणि व्हिडीओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केले आहेत. यात सुखदाचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.
सुखदा तिच्या अभिनयापेक्षाही सौंदर्यामुळे जास्त चर्चेत येत असते. त्यामुळे सोशल मीडियावरही तिचा तगडा चाहतावर्ग असल्याचं दिसून येतो. सुखदादेखील या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम प्रयत्न करत असते. यात अलिकडेच तिने तिच्या मान्सून ट्रिपचे काही फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये तिच्यातील अल्लडपणा दिसून येत आहे.
सुखदाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती पाण्यात भिजण्याचा मनमुराद आनंद घेत आहे. इतकंच नाही तर तिच्याकडे पाहिल्यानंतर ती बालपणीच्या आठवणीत रममाण झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे.