Surekha kudchi : Video - "शेतकऱ्याचे कष्ट आपल्याला शहरात बसून कळत नाही"; मराठमोळ्या अभिनेत्रीची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 12:33 PM2023-06-07T12:33:20+5:302023-06-07T13:01:42+5:30

Surekha kudchi : सुरेखा कुडची शुटींगदरम्यान गावच्या जगण्याचा अनुभव घेत आहेत. शेतकऱ्यांचे कष्ट नेमके काय असतात हे त्यांनी अत्यंत जवळून पाहिलं आहे.

marathi actress Surekha kudchi special post for farmers | Surekha kudchi : Video - "शेतकऱ्याचे कष्ट आपल्याला शहरात बसून कळत नाही"; मराठमोळ्या अभिनेत्रीची खास पोस्ट

Surekha kudchi : Video - "शेतकऱ्याचे कष्ट आपल्याला शहरात बसून कळत नाही"; मराठमोळ्या अभिनेत्रीची खास पोस्ट

googlenewsNext

कलर्स मराठीवरील 'शेतकरीच नवरा हवा' ही मालिका अत्यंत लोकप्रिय आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यावर आधारित असलेली ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सयाजी आणि रेवाची जोडी प्रेक्षकांना फार आवडते. सध्या ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आहे. अभिनेत्री सुरेखा कुडची या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याच दरम्यान त्यांनी सोशल मीडियावर एक स्पेशल व्हि़डीओ शेअर करत खास पोस्ट केली आहे. 

'शेतकरीच नवरा हवा' या मालिकेच साताऱ्यात चित्रीकरण सुरू आहे. शेतकऱ्याच्या आयुष्यातील निगडीत गोष्टी आणि गावचं जगणं असं एकंदरीत या मालिकेच कथानक आहे. सध्या सुरेखा कुडची देखील शुटींगदरम्यान याच गावच्या जगण्याचा अनुभव घेत आहेत. शेतकऱ्यांचे कष्ट नेमके काय असतात हे त्यांनी अत्यंत जवळून पाहिलं आहे. याचनिमित्ताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. ज्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. 

"सध्या साताऱ्यात शेतकरीच नवरा हवा या मालिकेनिमित्त गेले काही महिने राहतोय...... या मालिकेमुळे गावातल जीवन खूप जवळून अनुभवता आलं... त्यातल्याच एका सीनसाठी भुईमुगाच्या शेतात गेलो आणि पाहिलं की त्या बायका कडक उन्हात काम करत होत्या... मग काय त्यांना थोडा हातभार म्हणून आम्ही सगळेच कामाला लागलो.... जाम मज्जा आली.... आणि हो शेतकरीच नसते तर? हा प्रश्न उभा राहिला.... त्यांचे कष्ट आपल्याला शहरात बसून कळत नाही..... त्या सर्व शेतकऱ्यांना सलाम....." असं सुरेखा कुडची यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 
 

Web Title: marathi actress Surekha kudchi special post for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.