'..म्हणून मी त्याच्यासोबत लग्न केलं'; सुरुची अडारकरने सांगितलं पियुषसोबत लग्न करण्यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 09:49 AM2023-12-07T09:49:06+5:302023-12-07T09:52:18+5:30
Suruchi adarkar: अभिनेत्रीची लग्नानंतर पहिली प्रतिक्रिया, सांगितलं पियुषसोबत का केलं लग्न
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकर (suruchi adarkar) हिने नुकतीच अभिनेता पियुष रानडे (piyush ranade) याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे सध्या मराठी कलाविश्वात या जोडीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. मोठ्या थाटात या जोडीने लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. सुरुची आणि पियुष यांनी फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. मात्र, नेटकऱ्यांमधून सध्या या लग्नाविषयी संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. यामध्येच सुरुचीने लग्नानंतर पहिल्यांदाच पियुष आणि तिच्या नात्याविषयी भाष्य केलं आहे.
लग्नानंतर सुरुचीने 'टाइम्स ऑफ इंडिया' मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या लग्नसोहळ्याविषयी आणि खासकरुन पियुषविषयी तिची प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाली सुरुची?
"मी फार खुश आहे आणि माझा आनंद मी शब्दांमध्ये व्यक्त करु शकत नाही. हा क्षण म्हणजे माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखा होता. माझं एका चांगल्या व्यक्तीसोबत लग्न झालं यातच मी खूप आनंदी आहे. तो खूप काळजी घेणारा, इमोशनल व्यक्ती आहे. मी पियुषसोबत लग्न करायचा निर्णय घेतला त्यामुळे मी स्वत:ला फार भाग्यवान समजते.", असं सुरुची म्हणाली.
दरम्यान, सुरुची आणि पियुष यांनी त्यांचं नातं आणि लग्न कोणालाही कळू दिलं नाही. थेट लग्नाचे फोटो टाकून साऱ्यांना अचिंबत केलं. याविषयीसुद्धा तिने स्पष्टीकरण दिलं. "सगळ्या गोष्टींमध्ये प्रायव्हसी जपणं, त्या खासगी ठेवणं हा माझा स्वभाव आहे. माझं व्यक्तिमत्वचं तसं आहे. त्यामुळे मी आमच्या नात्याविषयी सुद्धा कोणाला कळू दिलं नाही. लग्न सुद्धा कुटुंबियांच्या उपस्थितीत खासगी पद्धतीने झालं", असंही तिने यावेळी सांगितलं.