'दिल दोस्ती दुनियादारी'फेम अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं झालं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 14:00 IST2022-06-12T13:58:41+5:302022-06-12T14:00:31+5:30
Swanandi tikekar: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या स्वानंदीने इन्स्टाग्रामवर तिच्या मामासोबतचे काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

'दिल दोस्ती दुनियादारी'फेम अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं झालं निधन
'दिल दोस्ती दुनियादारी' (dil dosti dunidari), 'मराठी इंडियन आयडॉल' (marathi indian idol) अशा किती तरी शो, कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्वानंदी टिकेकर (swanandi tikekar). उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या स्वानंदीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्वानंदीच्या मामाचं निधन झालं असून तिने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत याविषयीची माहिती चाहत्यांना दिली.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या स्वानंदीने इन्स्टाग्रामवर तिच्या मामासोबतचे काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने तिच्या मामाचं निधन झाल्याचं सांगितलं. स्वानंदीने शेअर केलेल्या पोस्टमधून तिचं आणि तिच्या मामाचं नातं किती घट्ट आणि मैत्रीपूर्ण होतं याची प्रचिती येते.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये स्वानंदीने तिच्या मामाचा आणि तिचा संवादही लिहिला आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिचं सात्वंन करणाऱ्या कमेंटही केल्या आहेत.
दरम्यान, स्वानंदी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून तिने तिच्यातील अभिनयाची चुणूक दाखवली. तर सिंगिंग स्टार या कार्यक्रमात तिने तिच्यातील गाण्याची कलाही सादर केली. उत्तम अभिनयासह गायिकाही असलेल्या स्वानंदीला तिच्या आईकडून गाण्याचा वारसा मिळाला आहे.