Video : मोदकाचा झाला मोमो! स्वानंदी टिकेकरची मोदक करताना उडाली तारांबळ, नवरा कमेंट करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 11:44 AM2023-09-20T11:44:41+5:302023-09-20T11:45:26+5:30

मोदक काही जमेना! स्वानंदी टिकेकरचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केल्या मजेशीर कमेंट

marathi actress swanandi tikekar shared modak making video her husband commented | Video : मोदकाचा झाला मोमो! स्वानंदी टिकेकरची मोदक करताना उडाली तारांबळ, नवरा कमेंट करत म्हणाला...

Video : मोदकाचा झाला मोमो! स्वानंदी टिकेकरची मोदक करताना उडाली तारांबळ, नवरा कमेंट करत म्हणाला...

googlenewsNext

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटींनीही मोठ्या जल्लोषात लाडक्या बाप्पाचं घरी आगमन केलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी आणि बॉलिवू़ड सेलिब्रिटी गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना दिसत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावरुन बाप्पाचे फोटोही शेअर केले आहेत. आपल्या लाडक्या बाप्पासाठी कलाकारांनी स्वत:च्या हाताने मोदकही बनवले. 

मराठमोळी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरनेही बाप्पासाठी मोदक बनवण्याचा प्रयत्न केला. स्वानंदीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मोदक बनवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती उकडीचे मोदक बनवताना दिसत आहे. पण, स्वानंदीला बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवणं काही जमलेलं नाही. हा मजेशीर व्हिडिओ शेअर करत तिने "मोदकाचा झाला मोमो" असं म्हटलं आहे. 

अंबानींच्या घरी सिंपल लूकमध्ये दिसली ऐश्वर्या, मिस वर्ल्डचा अवतार पाहून नेटकरीही चक्रावले, म्हणाले, "तुला फॅशन..."

स्वानंदीच्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. अभिनेता यशोमन आपटेनेही स्वानंदीच्या या व्हिडिओवर कमेंट केली आहे. "वाह!!! ओ कुलकर्णी!!! मुलीला मोदक जमत नाहीत! आता बसा बोंबलत", अशी कमेंट यशोमनने केली आहे. त्याच्या या कमेंटवर स्वानंदीचा होणारा नवरा आशिष कुलकर्णीने रिप्लाय करत "काही हरकत नाही रे, मी घेतोय शिकून" असं म्हटलं आहे. 

'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या स्वानंदीने गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तिने अनेक शोचं सूत्रसंचालनही केलं आहे. स्वानंदीने जुलै महिन्यात आशिष कुलकर्णीबरोबर साखरपुडा केला. लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत. 

Web Title: marathi actress swanandi tikekar shared modak making video her husband commented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.