'सासूबाईंना मी माझ्या तालावर नाचवलं'; मराठी अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 16:27 IST2023-11-16T16:27:04+5:302023-11-16T16:27:49+5:30
Swati deval: स्वातीच्या सासूबाईंचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'सासूबाईंना मी माझ्या तालावर नाचवलं'; मराठी अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्वाती देवल ( swati deval). 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून स्वाती घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने नेहाच्या (प्रार्थना बेहरे) वहिनीची भूमिका साकारली होती. ग्रे शेड असलेली ही भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली. विशेष म्हणजे स्वाती खऱ्या आयुष्यातही तितकीच मस्तीखोर आणि मनमोकळ्या स्वभावाची असल्याचं पाहायला मिळतं. अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिच्या सासूबाईंसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चक्क तिच्या सासूबाई तिच्या तालावर नाचताना दिसत आहेत.
स्वाती सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम काही मजेशीर रिल्स शेअर करत असते. यावेळी तिने खास सासूबाईंसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. इतकंच नाही तर या व्हिडीओला तिने दिलेलं कॅप्शन जास्त लक्षवेधी ठरत आहे.
प्रेक्षकांना आपलंसं करणारी स्वाती खऱ्या आयुष्यातही माणसांना असंच जोडून ठेवताना दिसते. तिच्या व्हिडीओमधूनही हा प्रत्यय येतो. स्वातीने तिच्या सासूबाईंसोबत चक्क एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे स्वातीने तिच्या सासूबाईंना हा डान्स शिकवला असून त्यांनीही तो छान पद्धतीने सादर केला आहे.
स्वाती आणि तिच्या सासूने एका जुन्या बॉलिवूड गाण्यावर ताल धरला आहे. सोबतच "आज मी म्हणू शकते.. सासूबाईंना मी माझ्या तालावर नाचवल. 2 reahersals one take..hatss of.. हौशी एकदम.boss to boss होता है", असं कॅप्शन स्वातीने हा व्हिडीओ शेअर करत दिली आहे.