आसावरी-शुभ्राने केला योहानीच्या गाण्यावर भन्नाट डान्स; सासू-सुनेचा व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 17:30 IST2021-11-25T17:30:00+5:302021-11-25T17:30:00+5:30
Tejashri pradhan: 'अग्गंबाई सूनबाई' ही मालिका संपून आज बरेच दिवस झाले आहेत. मात्र, त्यातील कलाकार कायमच चर्चेत असतात.

आसावरी-शुभ्राने केला योहानीच्या गाण्यावर भन्नाट डान्स; सासू-सुनेचा व्हिडीओ होतोय व्हायरल
काही चित्रपट, मालिका अशा असतात ज्या बंद झाल्या तरीदेखील प्रेक्षकांच्या स्मरणात कायम राहतात. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'अग्गंबाई सूनबाई'. एका लाडावलेल्या मुलाची आणि त्याच्या आईची कथा या मालिकेत उलगडण्यात आली. ही मालिका संपून आज बरेच दिवस झाले आहेत. मात्र, त्यातील कलाकार कायमच चर्चेत असतात. सध्या या मालिकेतील सासू-सुनेची चर्चा सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
काही दिवसांपूर्वीच श्रीलंकन गायिका योहानीचं Manike Mage Hithe हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या गाण्यावर इन्स्टा रिल्स, व्हिडीओ तयार केले. इतकंच नाही तर हे गाणं हिंदीसह अनेक भाषांमध्येही तयार करण्यात आलं. त्यामुळे हे गाणं अजूनही टॉप ट्रेंडिंग गाण्यांपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे याच गाण्यावर शुभ्रा आणि आसावरी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि निवेदिता सराफ यांनी ताल धरला आहे.
तेजश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती निवेदिता सराफ यांच्यासोबत Manike Mage Hithe या गाण्यावर शास्त्रीय नृत्य सादर करतांना दिसत आहे. विशेष म्हणजे या दोघीही मज्जामस्ती म्हणून हा व्हिडीओ करत असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, Manike Mage Hithe हे गाणं सध्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं. अनेक सेलिब्रिटींनी या गाण्यावर डान्स केला आहे. परंतु, आसावरी- शुभ्राचा डान्स विशेष चर्चिला जात आहे. अग्गंबाई सूनबाई या मालिकेत या दोघींनी सासू-सुनेची भूमिका साकारली होती.