तेजश्री प्रधानचं मातृछत्र हरपलं; अभिनेत्रीच्या आईचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 17:34 IST2023-11-17T17:33:44+5:302023-11-17T17:34:07+5:30
Tejashri pradhan: तेजश्रीच्या आईचं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं आहे.

तेजश्री प्रधानचं मातृछत्र हरपलं; अभिनेत्रीच्या आईचं निधन
'होणार सून मी या घरची' या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तेजश्रीच्या आईचं निधन झालं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून तेजश्रीची आई आजारी होती. त्यामुळे या आजारपणात त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
तेजश्रीच्या आईचं काल (१६ नोव्हेंबर) राहत्या घरी निधन झालं आहे. त्यामुळे सध्या प्रधान कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. तेजश्रीच्या आईच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर कलाविश्वातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, तेजश्री आणि तिच्या आईचं बॉण्डिंग खूप छान होतं. तेजश्री बऱ्याचदा तिच्या आईसोबत वा तिच्या कुटुंबियांसोबतचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तेजश्री सध्या 'तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट' या मालिकेत काम करत आहे. यापूर्वी तिने होणार 'सून मी या घरची', 'अग्गंबाई सासूबाई' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर, 'ती सध्या काय करते', 'डॉ. प्रकाश बाबा आमटे', 'झेंडा', 'लग्न पहावे करुन' यांसारख्या सिनेमातही झळकली आहे.