यंदाचा valentine day आहे तितीक्षासाठी स्पेशल; सांगितला या खास दिवसाचा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 17:45 IST2024-02-09T17:43:58+5:302024-02-09T17:45:10+5:30
Titeeksha tawde: तितीक्षाने नुकतीच तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.

यंदाचा valentine day आहे तितीक्षासाठी स्पेशल; सांगितला या खास दिवसाचा प्लॅन
मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहेत. अनेक लोकप्रिय अभिनेत्री लग्नाच्या बेडीत बांधल्या जात आहेत. यामध्येच सातव्या मुलीची सातवी मुलगी फेम तितीक्षा तावडे (titeeksha tawde) हिने नुकतीच तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. तितिक्षाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेता सिद्धार्थ बोडके (siddharth bodke) याच्यासोबत लग्नगाठ बांधणार असल्याचं जाहीर केलं आहे. यामध्येच आता लग्नाची चर्चा रंगत असताना तिने व्हॅलेंटाइन डेचं सेलिब्रेशन कसं करणार याचा प्लॅन सुद्धा सांगितला आहे.
यंदाचा व्हॅलेटाइन डे असणार खास
"प्रेम व्यक्त करण्याच्या बाबतीत मी खूप एक्सप्रेसिव्ह आहे. ज्या व्यक्तींवर माझं प्रेम आहे त्यांना वेळ देणं, त्यांच्याशी सतत संपर्कात राहणं आणि त्यांना जाणीव करून देणं की तुमची काळजी करायला मी आहे, ही माझी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. माझ्या त्या प्रिय व्यक्तीला म्हणजेच सिद्धार्थ बोडकेला एक निरोप देईन की, प्रेम काय आहे हे कोणी अजून डिकोड नाही केलंय तर आपण दोघे मिळून ते डिकोड करण्याचा प्रयत्न करू, थोडं तू चूक, थोडं मी चुकते आणि चुकीतून शिकून मोठं होऊ आणि भरभरून प्रेम करायला शिकू", असं तितीक्षा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "१४ फेब्रुवारीला 'सातव्या मुलीची सातव्या मुलगी'चं शूटिंग करणार आहे. मात्र, त्यानंतर जो काही थोडा वेळ मिळेल तो मी त्याच्यासोबत घालवणार आहे."
दरम्यान, नुकतीच तितीक्षाने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. तितीक्षा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तर सिद्धार्थने मराठीसह बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. 'तू अशी जवळी राहा' या मालिकेत सिद्धार्थ आणि तितिक्षाने एकत्र काम केलं होतं. तितीक्षा सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत झळकत आहे. तर, आहे. सिद्धार्थ अजय देवगणच्या 'दृश्यम २' सिनेमातही तो झळकला होता.