'सोनी दे नखरे' गाण्यावर थिरकली रुपल नंद; 'या' अभिनेत्रीने दिली साथ, जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:33 IST2025-02-20T13:29:11+5:302025-02-20T13:33:01+5:30
अभिनेत्री रुपल नंद (Rupal Nand) ही मराठी मालिका विश्वातील नावाजलेली नायिका आहे.

'सोनी दे नखरे' गाण्यावर थिरकली रुपल नंद; 'या' अभिनेत्रीने दिली साथ, जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष
Rupal Nand: अभिनेत्री रुपल नंद (Rupal Nand) ही मराठी मालिका विश्वातील नावाजलेली नायिका आहे. वेगवेगळ्या मालिका,चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारून तिने प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या रुपल नंद स्टार प्रवाह वाहिनीवरील 'तू ही रे माझा मितवा' या मालिकेत अंजली नावाची मध्यवर्ती भूमिका ती साकारत आहेत. रुपल नंद सोशल मीडियावर सुद्धा कमालीची सक्रिय असते. त्याद्वारे आपले फोटो व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करते. नुकताच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक छान व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये भन्नाट डान्स करताना दिसते आहे.
अभिनेत्री रुपल नंदने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत 'तू ही रे माझा मितवा' मालिकेतील तिची सहकलाकार वल्लरी म्हणजेच अभिनेत्री सुरभी भावे सुद्दा पाहायला मिळतेय. या दोघींनी सलमान खान आणि गोविंदाच्या पार्टनर चित्रपटातील सोनी दी नखरे... या गाण्यावर थिरकल्या आहेत. व्हिडीओंमधील या दोघांची धमाल पाहून नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलंय. हटके डान्स स्टेप करत हा व्हिडीओ शेअर रुपलने सोशल मीडियावर यांनी शेअर केलाय. "Soni De Nakhre" असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.
रुपल आणि सुरभीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. मालिकेच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, खूप सुंदर दिसत आहेत जबरदस्त कडक फटाकाच तर दुसऱ्याने कमेंट करत विचारलं, "सुंदर एक्सप्रेशन्स आणि डान्स...".
दरम्यान, 'तू ही रे माझा मितवा' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत अभिनेता अभिजीत आमकर, शर्वरी जोग तसेच आशुतोष गोखले, रुपल नंद, मधुरा जोशी आणि रुचिरा जाधव अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळतेय.