"प्रेम भी तू,दोस्त भी तू..."लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पाठकबाईंची राणादासाठी रोमॅंटिक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 10:47 AM2024-12-02T10:47:50+5:302024-12-02T10:51:50+5:30
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी घराघरात पोहोचले.
Hardeek Joshi and Akshaya Deodhar: 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी घराघरात पोहोचले. या मालिकेत राणादा आणि पाठकबाईंची व्यक्तिरेखा साकारून हार्दिक-अक्षयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यादरम्यान मालिकेत काम करत असताना अक्षया आणि हार्दिकचे खऱ्या आयुष्यातही सूर जुळले.
हार्दिक आणि अक्षयाने गेल्यावर्षी २ डिसेंबर २०२२ ला लग्नगाठ बांधली. आज त्यांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अक्षया देवधरनेसोशल मीडियावर लाडक्या नवऱ्यासाठी रोमँटिक अंदाजात खास पोस्ट शेअर केली आहे.
अक्षया देवधरने नुकतेच इन्स्टाग्रामवर लग्नातील काही खास फोटो पोस्ट शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्याने अक्षयाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या कॅप्शनध्ये तिने लिहलंय, "प्रेम भी तू, दोस्त भी तू, एक भी तू, हजार भी तू; गुस्सा भी तू, माफी भी तू, जिंदगी के सफर में काफी भी तू….",असं तिने म्हटलं आहे. सहजीवनाची दोन वर्ष पूर्ण होताच हार्दिक-अक्षयाने एकमेकांना खास अंदाजात शुभेच्छा देत सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील गोड फोटो पोस्ट केले आहेत.
हार्दिकनेही अक्षया लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यामध्ये लिहलंय,"ज्या दिवशी मी तुझ्याशी लग्न केलं, तो माझ्या आयुष्यातील खूपच सुंदर दिवस होता. मी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही, एवढा तो दिवस माझ्यासाठी खास होता आणि आपलं लग्न सुद्धा माझ्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. तू माझी Soulmate, माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहेस. आय लव्ह यू, माय लव्ह. माझी राणी,अक्षरा देवधर! तुला लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."
दरम्यान, या दोघांनीही इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीची 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपल्यानंतर हार्दिकने अक्षयाला लग्नाची मागणी घातली होती. त्यानंतर दोघांनी साखरपुडा केला. त्यांच्या निर्णयाने चाहते देखील प्रचंड खुश झाले होते.