'जिवाची होतिया काहिली'मध्ये उषा नाईकची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 07:35 PM2023-05-03T19:35:25+5:302023-05-03T19:35:49+5:30

Usha Naik: उषा नाईक यांनी विविध चित्रपट आणि मालिका यांमधून आपल्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. आता एका वेगळ्या भूमिकेत त्या प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

MARATHI ACTRESS Usha Naiks entry in Jivachi Hotiya Kahili | 'जिवाची होतिया काहिली'मध्ये उषा नाईकची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

'जिवाची होतिया काहिली'मध्ये उषा नाईकची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

googlenewsNext

सोनी मराठी वाहिनीवरील 'जिवाची होतीया काहिली' ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. मराठी आणि कानडी अशा दोन भिन्न भाषिक कुटुंबात वाढलेल्या जोडप्यावर या मालिकेत भाष्य करण्यात आलं आहे. राज हंचनाळे याने या मालिकेत साकारलेली भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली असून आता या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.

या मालिकेत राजव्यतिरिक्त अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर ही मुख्य भूमिकेत झळकली आहे. या मालिकेत तिने कानडी भाषिक रेवथीची भूमिका साकारली आहे. मात्र, आता यात अर्जुन आणि रेवथी यांच्या प्रेमात कार्तिकनंतर आणखी एका व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. ही व्यक्ती म्हणजे रेवथीची आत्या.

अर्जुन आणि रेवथी यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आहे. पण आता कार्तिकच्या येण्यामुळे मालिकेने वेगळे वळण घेतले असून अर्जुन आणि रेवथी यांच्या प्रेमात अडथळा पाहायला मिळतो आहे.  त्यातच भरीस भर भद्राक्का येणार आहे. भद्राक्काच्या भूमिकेत उषा नाईक या दमदार अभिनेत्री  पाहता येणार आहेत. भद्राक्का ही रेवथीच्या अप्पांची बहीण आहे. ती कोकटनूरांच्या घरी आल्यानंतर  आप्पांचाही  थरकाप उडाला आहे. भद्राक्काच्या येण्याने वाड्यात कोणते नवीन वादळ येणार, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. रेवथी आणि अर्जुन यांच्या आयुष्यात भद्राक्काच्या येण्याने  काय बदल होतील, हे आता पाहता येईल. 

दरम्यान, उषा नाईक यांनी विविध चित्रपट आणि मालिका यांमधून आपल्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. आता एका वेगळ्या भूमिकेत त्या प्रेक्षकांसमोर येणार आहेत. मालिकेतील त्यांच्या  वेषभूशेबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चा होईल यात काही शंका नाही. 
 

Web Title: MARATHI ACTRESS Usha Naiks entry in Jivachi Hotiya Kahili

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.