'ही' प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री करतीये सोलो ट्रीप; थेट एकटीच पोहोचली हंम्पीमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 05:57 PM2023-12-14T17:57:15+5:302023-12-14T17:57:42+5:30
Marathi actress: या अभिनेत्रीला कायम सोलो ट्रीप करायला आवडते. त्यामुळे ती नवनवीन ठिकाणांना भेट देत असते.
अनेक जण असे असतात ज्यांना एकांत किंवा एकटेपणा आवडतो. यात बरीच मंडळी अशीही असतात जे एकटेच स्वत:ची कंपनी एन्जॉय करतात. त्यामुळे मग एकटं रहाणं, सोलो ट्रीप करणं अनेकांना आवडतं. सध्या अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीला सोलो ट्रीप करायची प्रचंड आवड असून ती कायम वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत असते.
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री विदिशा म्हसकर (Vidisha Mhaskar) हिची चर्चा रंगली आहे. रंग माझा वेगळा या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या विदिशाला नवनवीन ठिकाणांना भेट द्यायला प्रचंड आवडतं. यात खासकरुन एकटीने प्रवास करणं, नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करणं हा तिचा आवडीचा विषय त्यामुळे ती बऱ्याचदा तिची बॅग उचलते आणि एकटीच फिरायला निघते. आताही ती हिम्पीला तिचं व्हेकेशन एन्जॉय करत आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या विदिशाने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यात ती हम्पी, मुन्नार यांसारख्या ठिकाणांना भेट देत आहे. हे फोटो शेअर करत तिने ती सोलो ट्रीपवर असल्याचंही आवर्जुन सांगितलं आहे. त्यामुळे सध्या तिचे फोटो नेटकऱ्यांमध्ये व्हायरल होत आहेत.
दरम्यान, कर्नाटक टूरपूर्वी ती हिमाचल प्रदेशला गेली होती. इथेही ती सोलो ट्रीपसाठीच गेली होती. रंग माझा वेगळा, मन बावरे, फुलराणी, बन मस्का अशा कितीतरी मालिकांमध्ये विदिशी झळकली आहे.