'भाग्य दिले तू मला' मध्ये विदिशा म्हसकरची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 15:46 IST2024-01-07T15:46:06+5:302024-01-07T15:46:49+5:30
Vidisha Mhaskar: तिच्या येण्यामुळे राजवर्धन- कावेरीच्या नात्यावर होणार का परिणाम?

'भाग्य दिले तू मला' मध्ये विदिशा म्हसकरची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका
छोट्या पडद्यावर सध्या लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे 'भाग्य दिले तू मला'. सध्या या मालिकेत मोहिते कुटुंबात अनेक वादविवाद सुरु आहेत. याच कारणामुळे रत्नमाला मोहितेंना कावेरी, राजवर्धनसोबत त्यांचं राहतं घर सोडावं लागलं. इतकंच नाही तर त्यांच्या बिझनेसवरही त्यांनी पाणी सोडलं आहे. त्यामुळे सध्या ही मालिका सातत्याने चर्चेत येत आहे. यामध्येच आता या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्री एन्ट्री होणार आहे.
भाग्य दिले तू मला या मालिकेत आता अभिनेत्री विदिशा म्हसकर (vidisha maskar) हिची एन्ट्री होणार आहे. या मालिकेत विदिशा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. हातातून घर आणि कंपनी गेल्यानंतर कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी राजवर्धन एका कंपनीत नोकरीला लागणार आहे. या कंपनीच्या नव्या बॉसच्या भूमिकेत विदिशा दिसणार आहे.
या मालिकेत विदिशाने किमया ही भूमिका साकारली आहे. आता किमयाच्या येण्यामुळे राजवर्धन आणि कावेरी यांच्या नात्यावर त्याचा कसा परिणाम होणार हे मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे.
दरम्यान, यापूर्वी विदिशाने 'रंग माझा वेगळा' या मालिकेत आयशा ही भूमिका साकारली होती. तसंच ती '36 गुणी जोडी', 'बन मस्का', 'मन बावरे' यांसारख्या मालिकेत झळकली आहे.