परदेशी असलेल्या लेकाने दिवाळीत केले लाडू! विशाखा सुभेदार झाल्या भावुक; म्हणतात- "माझ्या डोळ्यातल्या पाण्यामुळे.."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 09:53 AM2024-10-30T09:53:48+5:302024-10-30T09:54:20+5:30
परदेशी असलेल्या लेकाने पहिल्यांदा दिवाळीच्या दिवसात लाडू बनवल्यावर विशाखा सुभेदार यांनी खास पोस्ट लिहून लेकाचं कौतुक केलंय
विशाखा सुभेदार या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. विशाखा सुभेदार सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्याच सक्रीय असतात. विशाखा यांचा मुलगा अभिनय परदेशी शिक्षणाला गेलाय. विशाखा यांनी काही दिवसांपूर्वी लेकाला निरोप देतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केला. विशाखा यांनी नुकतेच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलेत. यात विशाखा यांचा लेक अभिनयने परदेशात राहून दिवाळीचा फराळ केलाय.
विशाखा यांनी फोटो शेअर करुन लिहिलंय की, "पोर.. Abhinay Subhedar शिकता शिकता स्वयंपाक ही करु लागे.. आणि दिवाळीत स्वतः बेसनाचे लाडू देखील केले...खुप भारी वाटतंयं... फराळ वैगेरे करण माझ कधीच मागे पडलं.. पुड्याला कात्री लावली कीं पडला डब्यात फराळ... झाली दिवाळी..! हल्ली फराळ तर 12 महिने चालूच असतो... पण परदेशी गेल्यावर आपलं सगळं हट्टाने हवं असतं नई...! सण, पदार्थ.. भावंड, मित्र मैत्रिणी आई बाबा.. पण हें सगळी नाती एका लाडवाच्या गोडीत असतात रे...आणि त्यात तु तो पहिल्यांदा बनवला आहेस मग तर तो कायच्या काय उत्तम झाला असणार.."
विशाखा सुभेदार पुढे लिहितात, "माझ्या डोळ्यातल्या पाण्यामुळे थोडी खारट चव आली खरी ओठांवर पण बेसन लाडू ने तोंड गोड केलं बरं.. तुझं खुप कौतुक.. अबुली.. मी घरी नसूनही तू खुप काय काय शिकलास ,खरंतर त्याचमुळे तू किती स्वावलंबी झालास आणि आत्ता तर अजून होतोयस..खुप शाब्बासकीं तुला..! कायमच तुझी वाट पाहणारी, तुझ्यासाठी जगणारी तुझी आई.आणि आपला बाबाही."