'वय वर्षे ५२ पण कसलं पळवलंस त्यांना...'; पॅडीचा खेळ पाहून विशाखा सुभेदार थक्क! मित्राचं केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 01:20 PM2024-09-13T13:20:53+5:302024-09-13T13:21:22+5:30

बिग बॉस मराठीच्या घरात काल पॅडी कांबळेच्या जबरदस्त खेळाचं कौतुक होतंय (bigg boss marathi 5)

marathi actress Vishakha Subhedar praised paddy kamble game in bigg boss marathi 5 | 'वय वर्षे ५२ पण कसलं पळवलंस त्यांना...'; पॅडीचा खेळ पाहून विशाखा सुभेदार थक्क! मित्राचं केलं कौतुक

'वय वर्षे ५२ पण कसलं पळवलंस त्यांना...'; पॅडीचा खेळ पाहून विशाखा सुभेदार थक्क! मित्राचं केलं कौतुक

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये काल कॅप्टनसी टास्क रंगताना दिसला. यावेळी सदस्यांना उशीत कापूस भरुन ती उशी लटकवायची होती. यावेळी पॅडी अर्थात पंढरीनाथ कांबळेने अफलातून खेळ दाखवत समोरच्या टीमला सरो की पळो करुन सोडलं. पॅडीने अरबाज-वैभव या दोघांना चांगलंच पळवलं. चपळाईने खेळ खेळत पॅडीने सर्वांचं लक्ष वेधलं. पॅडीच्या याच खेळाचं त्याची मैत्रीण आणि मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी कौतुक केलंय.

विशाखा सुभेदार पॅडीबद्दल काय म्हणाल्या?

विशाखा सुभेदार सध्या त्यांचा मित्र आणि बिग बॉस मराठीमध्ये सहभागी असलेल्या पॅडी अर्थात पंढरीनाथ कांबळेबद्दल खास पोस्ट लिहित असतात. विशाखा यांनी पॅडीच्या कालच्या खेळाबद्दल पोस्ट लिहित म्हटलंय की, "काल काय जोरदार रंगला खेळ.. वय वर्षे 52 असावं तूझ अंदाजे .. पण बाबो..कसलं पळवलं आहेस त्यांना..! मज्जा आली.. बहारदार खेळला आहेस तू.. Paddy Kamble .. निक्कीची टकळी सुरु असताना तू जे उत्तर देतोस नं तिला त्यानंतर काय बोलव ते सुचत नाही..अभी तो खेल शुरु हुआ हैं..!"



पॅडीच्या खेळाची जोरदार चर्चा

काल पॅडी कांबळेने कॅप्टनसी टास्कमध्ये अभिजीत, अंकिताच्या टीममधून खेळताना चांगला खेळ खेळला. पॅडीने चपळाईने समोरच्या टीमच्या उशी पळवल्या. अरबाज, वैभव ही दोघंही घरातील ताकदवान माणसं पॅडीच्या मागे धावत होते. पण पॅडी कोणाच्या हाताला लागत नव्हता. पॅडीमुळे समोरच्या टीमला चांगलाच घाम फुटला होता. इतकंच नव्हे तर जेव्हा निक्की वाद करायला पुढे येत होती तेव्हा पॅडी संभाषणचातुर्य दाखवत निक्कीची बोलती बंद करत होता.

Web Title: marathi actress Vishakha Subhedar praised paddy kamble game in bigg boss marathi 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.