"निक्कीला नडणं इतकं परफेक्ट होतं"; विशाखा सुभेदार यांनी केलं पॅडी कांबळेच्या खेळाचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 11:24 AM2024-08-14T11:24:33+5:302024-08-14T11:25:48+5:30

विशाखा सुभेदार यांनी सात मुद्दे सांगून पॅडी चांगला का खेळतोय, याचं स्पष्टीकरण दिलंय (bigg boss marathi 5)

marathi actress vishakha subhedar talk about pandharinath kamble game in bigg boss marathi 5 | "निक्कीला नडणं इतकं परफेक्ट होतं"; विशाखा सुभेदार यांनी केलं पॅडी कांबळेच्या खेळाचं कौतुक

"निक्कीला नडणं इतकं परफेक्ट होतं"; विशाखा सुभेदार यांनी केलं पॅडी कांबळेच्या खेळाचं कौतुक

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये काल नॉमिनेशन टास्क झाला. या टास्कमध्ये बिग बॉसने नॉमिनेशन टास्कमध्ये अभिजीतला पॉवर कार्ड दिल्याने अभिजीतने सेफचा पर्याय निवडला. अभिजीतने या कार्यात सेफचं कार्ड निवडून त्याने पॅडीला नॉमिनेशनपासून वाचवलं. त्यामुळे पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी या आठवड्यात नॉमिनेशनपासून सेफ झालाय. पॅडीला उद्देशून अभिनेत्री विशाखा सुभेदारने खास पोस्ट केलीय. 

विशाखा सुभेदार यांची पॅडीसाठी खास पोस्ट

विशाखाने पॅडीचा फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, "तुझ्यातलं माणूस.. त्याला दिसलं असावं.. म्हणूनच मैत्रीच पाऊल त्याने उचलल...full सपोर्ट तुला..आता एकदा आपलं गाणं होऊन जाऊ दे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा...!
1)अरे बाबा भांडणात सुद्धा तू एकदाही चूक नव्हतास.. तुझे मुद्दे फंडे clear होते.. एक अख्खा दिवस तू तूझा खेळ होता. कुठेही चुकीचं पाऊल, वक्तव्य नाहीं, कोणालाही लागेल असं स्टेटमेंट नाहीं..
2) त्या पुढारीला तू कोण? असं त्याला विचारलंस तेव्हाच timing इतक कमाल होतं..कीं मरणाची हसले मी.
3) निक्की ला नडणं हे perfect होतं कारण हि रास्त. तिच्यावर आवाज.. मज्जा आली. तू तूझ काम करत नव्हतीस. आणि घूस त्या ड्रॉवर मध्ये सूर मार was एपिक.
4) काल वर्षा ताईंची नाजूक मुद्द्यावर बाजू घेतली. ताईंनी तूझा खांदा थोपटला.. 


 विशाखा सुभेदार पुढे लिहितात, 
5) dp ची साथ सुद्धा मज्जा मस्करी पिकनिक spot वर तू धमाल करीत असणार जे एक तासाच्या एपिसोड मध्ये पहायला मिळत नाहीं.. पिकनिक बास्केट सुद्धा गाजव.
हक्काने.
6) दोन आठवडे थंड होतास, उमजत नव्हतं कोण कायं कसं ह्याचा अंदाज घेत होतास..! प्रेक्षक आणि पिकनिक चे अध्यक्ष म्हटलं रितेशभाऊ पण आता नाहीं.. आता तर तू स्वार झालायस.. मांड आता तर ठोकलीयस.. शुरु झालंय game तूझा.
7) जरी तू शांत तरी नसे तू थंड.. आग हैं.. आम्हाला माहित आहे जीगरा हैं..! अशी मुद्देसूट पोस्ट करुन विशाखा सुभेदार यांनी पॅडीचं कौतुक केलंय

Web Title: marathi actress vishakha subhedar talk about pandharinath kamble game in bigg boss marathi 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.