Video: अक्षया-हार्दिकने स्वीकारलं सैया चॅलेंज; पाहा कलाकारांचं मजेशीर रिल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 18:03 IST2022-07-18T18:02:55+5:302022-07-18T18:03:31+5:30
Hardeek joshi: सध्या सोशल मीडियावर या कलाकारांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या कलाकारांचा हा मजेदार खेळ पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झालं आहे.

Video: अक्षया-हार्दिकने स्वीकारलं सैया चॅलेंज; पाहा कलाकारांचं मजेशीर रिल
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे हार्दिक जोशी (hardeek joshi) आणि अक्षया देवधर (akshaya deodhar). काही दिवसांपूर्वीच या दोघांनी साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. तेव्हापासून सातत्याने ही जोडी चर्चेत येत आहे. सध्या या दोघांचा एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघांनीही सध्या ट्रेडिंग असलेलं 'सैया' गाण्याचं चॅलेंज स्वीकारल्याचं पाहायला मिळालं.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अक्षयाने अलिकडेच हार्दिक आणि काही मराठी कलाकारांसह लंडनवारी केली. यातील एक मजेशीर व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासह हार्दिक, नितीश चव्हाण आणि दिप्तीदेवी दिसून येत आहेत. या सगळ्यांनी सैय्या चॅलेंज स्वीकारलं असून मजेशीर अंदाजात हे गाणं गायलं. विशेष म्हणजे हे गाणं गात असताना सगळ्यांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर या कलाकारांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या कलाकारांचा हा मजेदार खेळ पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झालं आहे.