शिवानी-विराजसच्या घरी लगीनघाई; 'या' अभिनेत्रीच्या घरी पार पडलं केळवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 15:16 IST2022-04-22T15:15:47+5:302022-04-22T15:16:26+5:30
Shivani-Virajas: येत्या काही दिवसांमध्ये शिवानी आणि विराजस लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जातं.

शिवानी-विराजसच्या घरी लगीनघाई; 'या' अभिनेत्रीच्या घरी पार पडलं केळवण
मराठी कलाविश्वातील मोस्ट लव्हेबल कपल म्हणजे शिवानी रांगोळे (Shivani Rangole) आणि विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) . बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर ही जोडी अखेर लग्नबंधनात बांधली जाणार आहे. त्यामुळे सध्या या जोडीच्या घरी लगीनघाई सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच आता या जोडीच्या केळवणाचा कार्यक्रम पार पडला. मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीने या दोघांचं थाटामाटात केळवण केलं. विशेष म्हणजे या अभिनेत्री साधंसुधं जेवण केलं नसून चक्क पंचक्वांनांचा थाट केला होता.
अभिनेत्री सानिया चौधरी (Saaniya Chaudhari) हिने शिवानी आणि विराजससाठी खास केळवणाचा बेत केला होता. केळवण हे लग्नापूर्वी नववधू आणि वरासाठी ठेवलं जातं. यात जवळचे नातेवाईक किंवा मित्रपरिवार वधू वरांना त्यांच्या घरी जेवायला बोलावतात. सोबत त्यांना छानसं गिफ्टही देतात. असाच थाट शिवानी-विराजससाठी सानिया चौधरीने केला होता.
सानियाने विराजस-शिवानीसाठी छान जेवणाचा बेत केला होता. यात गोड पदार्थांपासून तिखट पदार्थांपर्यंत अनेक पदार्थांचा समावेश होता. या केळवणाचे फ फोटो सानियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. सानियाप्रमाणेच विराजस-शिवानीनेदेखील त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवर याचे काही फोटो शेअर केले आहेत.
दरम्यान, सानिया आणि शिवानी या दोघींनी 'सांग तू आहेस का?' या मालिकेत एकत्र काम केलं आहे. त्यामुळे शिवानी आणि सानियामध्ये चांगली मैत्री आहे. अनेकदा या दोघींनी सेटवरील त्यांचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले होते.