VIDEO: "त्यांच्या एनर्जीला हॅट्स ऑफ..." चिन्मय मांडलेकरने केलं निवेदिता सराफ यांचं तोंडभरून कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 04:59 PM2024-12-03T16:59:34+5:302024-12-03T17:02:04+5:30

अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf)आणि मंगेश कदम यांची मुख्य भूमिका असलेली 'आई बाबा रिटायर होत आहेत!' ही मालिका चर्चेत आहे.

marathi cinema actor chinmay mandlekar praised nivedita saraf video viral on social media | VIDEO: "त्यांच्या एनर्जीला हॅट्स ऑफ..." चिन्मय मांडलेकरने केलं निवेदिता सराफ यांचं तोंडभरून कौतुक 

VIDEO: "त्यांच्या एनर्जीला हॅट्स ऑफ..." चिन्मय मांडलेकरने केलं निवेदिता सराफ यांचं तोंडभरून कौतुक 

Aai Baba Retire Hot Aahet: अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf)आणि मंगेश कदम यांची मुख्य भूमिका असलेली 'आई बाबा रिटायर होत आहेत!' ही मालिका चर्चेत आहे. काल २ डिसेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दरम्यान, या मालिकेच्या निमित्ताने त्यातील टीम मेंबर्स वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देताना दिसत आहेत. अलिकडेच मालिकेच्या प्रमोशनदरम्यान अभिनेता चिन्मय मांडलेकरही (Chinmay Mandlekr)उपस्थित होता. त्या दरम्यान अभिनेत्याने निवेदिता सराफ यांचं तोंडभरून कौतुक केलं. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.


दरम्यान, 'आई बाबा रिटायर होत आहेत!' मालिकेच्या लेखनाची धुरा चिन्मय मांडलेकर सांभाळत आहे. त्यामुळे या मालिकेतील कलाकारांसोबत प्रमोशन इव्हेंटमध्ये चिन्मयही  उपस्थित होता. त्यादरम्यान अभिनेता म्हणाला, "निवेदिता ताईंच्या एनर्जीला हॅट्स ऑफ आहे. मला असं वाटतं, जितकं आपण या अभिनेत्रीला सेलिब्रेट केलं पाहिजे तितकं आपण करत नाही."

पुढे चिन्मय म्हणाला की, "मी त्यांच्याबरोबर नाटकातही काम केलं आहे. त्यामुळे त्या कसं काम करतात ते सुद्धा मी खूप जवळून पाहिलं आहे. आताही इथे शूटिंग करत आहेत त्याच वेळेला त्या निर्मात्या म्हणून मालिका करत आहेत त्याकडेही त्यांचं १०० टक्के लक्ष आहे. एवढं मल्टीटास्किंग करून सगळीकडे खूप चांगलं डिलिव्हर करणं हे काम फार सोपं नाही. त्याचबरोबर त्या इतरही अ‍ॅक्टिव्हिटी करत असतात. मी त्यांचा शेजारी आहे म्हणून मला माहित आहे. पण खरंच या बाईच्या एनर्जीला हॅट्स ऑफ आहे." असं अभिनेत्याने सांगितलं. 

'आई बाबा रिटायर होत आहेत!' या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ, मंगेश कदम तसेच अभिनेता हरिश दुधाडे, प्रतिक्षा जाधव तसेच आदिस वैद्य यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

Web Title: marathi cinema actor chinmay mandlekar praised nivedita saraf video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.